Wardha Crime News : दारूबंदी जिल्ह्यात डॉक्टरच आले झिंगून, त्या अवस्थेतच रुग्णांची तपासणी; तक्रारीनंतर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Wardha News : पुलगाव येथील ग्रामीण रुगण्लायात दोन शल्यचिकित्सक मद्यधुंद अवस्थेत रुग्णांची तपासणी करताना आढळून आले होते. त्याविरोधात रुग्णालयात उपस्थितांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर दोन्ही डॉक्टरांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
Wardha Crime News
Wardha Crime News Saam Digital

चेतन व्यास

Wardha Crime News

वर्धा जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुलगाव येथील ग्रामीण रुगण्लायात दोन शल्यचिकित्सक मद्यधुंद अवस्थेत रुग्णांची तपासणी करताना आढळून आले होते. त्याविरोधात रुग्णालयात उपस्थितांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर दोन्ही डॉक्टरांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांची कारही जप्त करण्यात आली आहे. डॉ. प्रवेश प्रतापसिंग धमाने रा. यशवंत कॉलनी वर्धा आणि डॉ. माणिकलाल राऊत रा. जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा, अशी अटक केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची नावे आहे.

पुलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरुपी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने एका वैद्यकीय अधिकाऱ्याच्या खांद्यावर रुग्णालयाचा डोलारा सुरू आहे. २२ रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास काही रुण रुग्णालयात आले. वैद्यकीय अधिकारी नसल्याने तेथील परिचारिकेने मी गोळया देऊ शकत नसल्याचे सांगितले. याची माहिती अंकुश कोचे यांना मिळाली असता त्यांनी रुग्णालयात जात ही जिल्हा शल्यचिकित्सकांना फोनद्वारे कळविली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जिल्हा शल्यचिकित्सकांनी डॉ. धमाने आणि डॉ. राऊत यांना वर्ध्याहून ग्रामीण रुग्णालयात पाठविले. दोन्ही डॉक्टर रात्री ९.३० वाजताच्या सुमारास रुग्णालयात मद्यधुंद अवस्थेत पोहचले. एका आठ वर्षीय मुलाला ताप आल्याने त्याची प्रकृतीही अत्यवस्थ होती. कोचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मद्यधुंद डॉक्टरांना उपचार करण्यास रोखले. पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी दोन्ही डॉक्टरांना पोलिस ठाण्यात नेत अटक करुन गुन्हा दाखल केला.

Wardha Crime News
Sangamner Crime News : शुल्लक कारणावरून वाद, दोन मित्रांकडून तरुणाची निर्घृण हत्या; संगमनेरमधील थरारक घटना

मद्यपी डॉ. प्रवेश धमाने याच्याविरोधात यापूर्वी देखील मद्यधुंद अवस्थेत रुग्णांवर उपचार केल्याच्या तक्रारी असल्याची चर्चा आहे. मद्यप्राशन करून असलेल्या डॉक्टरकडून मुलावर चुकीचा उपचार झाला असता तर याला जबाबदार कोण ठरले असते, त्यामुळे अशा मद्यपी डॉक्टरांवर कठोर कार्यवाही करण्याची गरज आहे. पुलगाव येथील रुग्णालयात मद्यधुंद डॉक्टर बाबत तक्रार प्राप्त झाली आहे. या डॉक्टरां बाबत आरोग्य संचालक आणि उपसंचालक यांना माहिती देण्यात आली असून तात्काळ कारवाईची मागणी केली असल्याच आमदार रणजित कांबळे यांनी सांगितलंय.दारूबंदी जिल्ह्यात दारूच्या नशेत रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरच्या या कृत्याचा सगळीकडे निषेध केला जातं आहे.

Wardha Crime News
Viral Video : बंदूक अन् चाकू घेऊन घरात शिरले चोर; धाडसी माय-लेकींनी दोघांना बेदम चोपून पळवून लावलं, व्हिडिओ व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com