पुणे ISIS दहशतवादी प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. दहशतवाद्यांचा महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट होता. यासाठी त्यांनी पुण्यातील कोंढवा भागात बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले होते, अशी धक्कादायक माहिती एनआयएच्या तपासातून समोर आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
इतकंच नाही, तर दहशतवाद्यांनी पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील जंगलांमध्ये जाऊन बॉम्बस्फोटाचा सराव केल्याचंही समोर आलं आहे. पुणे ISIS शस्त्रास्त्रे आणि स्फोटके जप्त केल्याप्रकरणी एनआयएने बुधवारी (13 मार्च) पहिले पुरवणी आरोपपत्र दाखल केले. (Latest Marathi News)
या आरोपपत्रात मोहम्मद शाहनवाज आलम, रिझवान अली, अब्दुल्ला शेख, तल्हा लियाकत खान अशा चार आरोपींची नावे जोडण्यात आली आहेत. यातील मोहम्मद इमरान मोहम्मद युनूस खान, मोहम्मद याकूब साकी या २ दहशतवाद्यांना १८ जुलै २०२३ रोजी पुणे पोलिसांनी अटक केली होती.
तर, इमरान शेख आणि मोहमद यूनुस साकी यांना चोरीच्या गुन्ह्यात पकडण्यात आलं होतं. सर्व आरोपी बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचे सदस्य असून ते दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देत असल्याचे एनआयएच्या तपासात समोर आले आहे.
आरोपींचा महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये बॉम्बस्फोट घडविण्याचा कट होता, यासाठी त्यांनी पुण्यातील कोंढवा भागात बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले होते, असं NIA तपासात समोर आलं आहे. याशिवाय महाराष्ट्रात दहशत पसरवण्याच्या मोठ्या कटात हे सर्व आरोपी सामील होते, अशी माहितीही देखील समोर आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.