Bihar Crime  Saam Tv
क्राईम

Crime: सामूहिक बलात्कार करून तरुणीची हत्या, ओढणीच्या सहाय्याने मृतदेह झाडाला लटकवला

Bihar Crime: मामाच्या गावी लग्नसोहळ्यासाठी गेलेल्या तरुणीसोबत भयंकर घडलं. या तरुणीचे अपरहण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिची हत्या करून मृतदेह झाडाला लटकवण्यात आला.

Priya More

Summary -

  • तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या

  • पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह झाडाला लटकवण्यात आला

  • तरुणी मामाच्या गावी लग्नासाठी आली होती

  • पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला

बिहारमध्ये एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. आरोपींनी हत्या करून तरुणीचा मृतदेह ओढणीच्या सहाय्याने झाडाला लटकवला. ही घटना सुपौल जिल्ह्यात घडली असून हत्या करण्यात आलेली मुलगी कॉलेजची विद्यार्थिनी होती. ती लग्नासाठी मामाच्या गावी आली होती. मामाच्या घराशेजारी राहणाऱ्या काही तरुणांनी तरुणीचे अपहरण करत तिच्यासोबत भयंकर कृत्य केले. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी तिचा मृतदेह झाडाला लटकवला. जेणेकरूनही आत्महत्या असल्यासारखे वाटावे.

त्रिवेणीगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मामाच्या गावी ही तरुणी लग्न सोहळ्यासाठी आली होती. या तरुणीचा मृतदेह तिच्याच मामाच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या बगीच्यामध्ये एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. ओढणीच्या सहाय्याने तिला झाडाला लटकवण्यात आले होते. जेणकरून पोलिसांना ही आत्महत्या असल्यासारखे वाटावे. हत्या झालेली तरुणी ही किशनपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहत होती. ती लहानपणापासूनच मामाच्या गावी शिक्षणासाठी राहत होती.

रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास ती एका नातेवाईकाच्या लग्नसोहळ्यासाठी गेली होती. रात्रीच्या सुमारास ती हॅण्डपंपवर हात धुवण्यासाठी गेली होती पण ती परत आलीच नाही. घरातील सर्व सदस्यांनी तिचा शोध घेतला. तेव्हा तिच्या कुटुंबीयांना तिचा मृतदेह एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. कुटुंबीयांनी तिला तात्काळ खाली उतरवले आणि रुग्णालयात नेले. पण डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिला मृत घोषीत केले.

हत्या झालेल्या तरुणीच्या कुटुंबीयांनी आरोप केला की, काही तरुणांनी तिचे अपरहण केले आणि बगीच्यात नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी तिचा मृतदेह ओढणीच्या सहाय्याने झाडाला लटकवला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी घटनास्थळावरून पुरावे जप्त केले आहेत. ते सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samrat Choudhary: लाखोंची एफडी, कित्येक तोळा सोनं,भाजपच्या नवीन मुख्यमंत्र्यांची संपत्ती किती?

अकोल्यात पुन्हा राडा, काँग्रेस नगरसेवकावर हल्ला, कारच्या काचा फोडल्या

सम्राट झाले बिहारचे चौधरी, नितीश कुमारांच्या पक्षाचे दोन उपमुख्यमंत्री

CBSE बोर्डचे पूर्ण नाव काय? नाव कसं पडलं? जाणून घ्या संपूर्ण इतिहास

Maharashtra News Live Update: अमरावती लैंगिक शोषण प्रकरणातील ४ आरोपींना अटक

SCROLL FOR NEXT