Maharashtra News Live Update: धाराशिवमधील पार्डीत टायरच्या दुकानाला भीषण आग

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: महाराष्ट्रात उष्णतेची लाट, भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण, गॅस सिलिंडरचा तुटवड्याचे संकट, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update :
Maharashtra Live News Update :Saam Marathi
Published On

dharashiv : धाराशिवमधील पार्डीत टायरच्या दुकानाला भीषण आग

धाराशिव जिल्ह्यातील पार्डी येथे टायरच्या दुकानाला भीषण आग

आगीमध्ये आठ ते दहा लाखाचे नुकसान

व्यावसायिक दीपक जाधव यांचे टायर व पंक्चर दुकान आगीत भस्मसात

शॉर्ट सर्किटमुळे आग लावल्याची माहिती,काही क्षणांतच दुकानाला भीषण आग,दुकानातील सर्व साहित्य जळून खाक

chhatrapati sambhaji nagar : मोबाईल चोरीला विरोध; तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला 

छत्रपती संभाजीनगर :

मोबाईल चोरीला विरोध केल्याने तरुणावर चाकू हल्ला करण्यात आलाय

करण राधाकिसन जाधव या तरुणाच्या पोटात चाकू खुपसला

घटनेचा CCTV फुटेज समोर

मुकुंदवाडी पोलिसांची तात्काळ कारवाई

तीन अल्पवयीन आरोपी ताब्यात

pune : तळेगाव दाभाडेमध्ये पेट्रोल पंपावर डिझेलच्या टँकरला आग; सुदैवाने कोणतीही जीवित झाली नाही

मावळच्या तळेगाव दाभाडे येथे डिझेल टँकरला अचानक आग लागली. शॉर्ट सर्किट मुळे आग लागण्याची प्राथमिक माहिती. वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे म्हाळस्करवाडी येथील शहा पेट्रोल पंपावर डिझेलने भरलेल्या टँकरला अचानक आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेमुळे काही काळ पेट्रोल पंप परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.. दरम्यान फोन करतात अग्निशामक दलाचे गाड्या स्पॉटला आल्यामुळे मोठा अनर्थ ठेवायला.

PUNE : भवानी पेठ मधील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मुक्काम बदलू नका; मुख्यमंत्र्यांकडे मागणी

संत परंपरेतील पालखी सोहळ्यात मागील सुमारे ३५० वर्षांपासून सुरू असलेला भवानी पेठ पालखी विठोबा मंदिर येथील मुक्काम हा परंपरेचा अविभाज्य भाग आहे. हा मुक्काम हलविण्याचा प्रयत्न होत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली आहे.या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. पालखी सोहळ्यात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये,तसेच प्रशासनाच्या माध्यमातून योग्य त्या सुविधा आणि उपाययोजना करण्यात याव्यात, यासाठी विनंती करण्यात आली. तसेच भवानी पेठ येथील पारंपरिक मुक्काम हलवू नये, अशी ठाम मागणी करण्यात आली.

Chandrapur: चंद्रपूरमध्ये अस्वलांची थरारक झुंज, पर्यटकांनी अनुभवला दुर्मिळ थरार

चंद्रपूरलगत असलेल्या कारवा येथील जंगलात आज पर्यटकांना अस्वलाच्या झुंजीचा दुर्मिळ थरार अनुभवायला मिळाला.

पाणवठ्याजवळ दोन अस्वल आले आणि त्यांनी मोठमोठ्याने आवाज करीत एकमेकांवर धावून गेले.

त्यांच्या किंकाळ्या आणि झुंज पर्यटकांना वेगळाच आनंद देऊन गेली.

अस्वलाच्या झुंज तशी दुर्मिळ मानली जाते. पण ती बघण्याचा आणि कॅमेरात कैद करण्याचे भाग्य आज पर्यटकांना लाभले.

Mumbai: मुंबईतल्या साकीनाका येथे कपड्याच्या गोदामाला आग

मुंबई -

साकीनाका येथे गारमेंट गोदामाला आग

अंधेरी (पूर्व) साकीनाका परिसरातील सेठिया नगरमध्ये आग

90 फूट रोडवरील गुलशन हॉटेलजवळील गारमेंट गोदामात घटना

G+2 इमारतीतील गोदामात आग लागल्याची माहिती

Amravati: परतवाडा- अचलपूर पोलीस स्टेशनच्या सहा पोलिसांना नियंत्रण कक्षात हलवलं

अमरावतीच्या परतवाडा येथील तरुणाने मुलींचे लैंगिक शोषण करून व्हिडिओ व्हायरल केल्याच प्रकरण

परतवाडा- अचलपूर पोलीस स्टेशनच्या सहा पोलिसांना नियंत्रण कक्षात हलवलं

स्थानिक पोलिसांकडून किंवा SIT मध्ये असलेल्या अधिकारी अंमलदारांकडून गुन्ह्याचा तपास सहा पोलिसांकडून प्रभावित होऊ नये म्हणून सहा पोलिसांना नियंत्रण कक्षात अटॅच केले

सलीम शेख,अब्दुल नाझीम अब्दुल कलीम, शुभम वर्मा, मयूर गुरव, मोहन वावरे, पुरुषोत्तम बावनेर असे पोलीस कर्मचाऱ्यांचे नावं

Parbhani: परभणीच्या सुजाता नगर भागातील गौतम मुंडे यांच्या घरावर गोळीबार

परभणी -

परभणीच्या सुजाता नगर भागातील गौतम मुंडे यांच्या घरावर गोळीबार

३ राउंड फायर केल्याची माहिती

कुठलीही जीवितहाणी नाही पोलिस पोचले घटनास्थळी

काल गौतम मुंडे आणि एकाची झाली होती बाचाबाची

यातूनच गोळीबार केला असल्याची माहिती

Nashik: नाशिक- संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात, एकाचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी 

नाशिक -

नाशिक- संभाजीनगर महामार्गावर गवंडगाव येथे मालवाहू ट्रक व स्विफ्ट कार यांच्यात समोरासमोर धडक झाली

या अपघातात एक जण ठार दोन जण गंभीर जखमी झाले आहे

अपघात झाला तेव्हा रस्त्याने जाणाऱ्या स्त्री रोग तज्ञ डॉक्टर दिपाली क्षत्रिय यांनी वेळीच रुग्णांना सीपीआर देऊन त्यांचा जीव वाचवलाॉ

जखमीची प्रकृती चिंताजनक असून त्यांना पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय येवला येथे दाखल करण्यात आला आहे

मोबाईल चोरीला विरोध; तरुणावर चाकू हल्ला,संभाजीनगरमधील घटना

छत्रपती संभाजीनगर शहरातील एपीआय कॉर्नर परिसरात मोबाईल चोरीला विरोध केल्यामुळे एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. करण राधाकिसन जाधव असे जखमी तरुणाचे नाव असून, आरोपींनी त्याच्या पोटात चाकू खुपसला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला तातडीने एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

पिंपरी-चिंचवडमध्ये टोळक्याकडून दोन तरुणांना बेदम मारहाण

पिंपरी चिंचवड शहरातील वाल्हेकर वाडी येथे तरुणाच्या एका टोळक्याने दोन तरुणान बेदम मारहाण करण्यात आली आहे. तरुणाच टोळकं दोन तरुणांना मारहाण करतानाची दृश्य सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली आहेत. मंगळवारी सात एप्रिल ला रात्री 11 वाजून 20 मिनिटा दरम्यान ही घटना चिंचवड येथील वाल्हेकर वाडी येथे घडली आहे. दोन तरुणांना मारहाण करून या टोळक्याने चिंचवड परिसरात दहशत निर्माण करण्याच काम केल आहे.

गांजा विकणाऱ्या दोन आरोपींना अटक; अंधेरी पूर्व परिसरात MIDC पोलिसांची मोठी कारवाई

मुंबईच्या अंधेरी पूर्व परिसरात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई

महाकाली केव्हज परिसरामध्ये गांजा विकणाऱ्या दोन आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी केली अटक

अटक आरोपीकडून पोलिसांनी 22 किलो गांजा केला जप्त

या गांजाचा बाजार भाव जवळपास साडेपाच लाख रुपये

घरगुती गॅसचा काळा बाजार करणाऱ्या दुकानावर काळेपडळ पोलिसांचा छापा

काळेपडळ पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात हांडेवाडी परिसरामध्ये एक इसम हा घरगुती गॅस मधून,व्यावसायिक गॅस सिलेंडर टाक्यांमध्ये गॅस ट्रान्सफर करत आहे.ही पाहीली असता,काव्या मल्टी सर्व्हसेस या दुकानाच्या बाजुलाच लागुन मारूती सुझुकी कंपनीचा एक सुपर कॅरी टॅम्पो क्रमांक एम.एच.१४ केजे ७९१७ या मध्ये घरगुती वापराच्या व व्यावसायिक टाक्या ठेवलेल्या दिसून आल्या.

IT कंपनीतील धर्मांतरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरण; अश्विनी चेनानीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

- अश्विनी चेनानीची पोलीस कोठडी आज संपत असल्यानं चेनानीला कोर्टात हजर करण्यात आलं.

IT कंपनीतील धर्मांतरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातील मॅनेजर आणि HR अश्विनी चेनानीला कोर्टात आणलं

- अश्विनी चेनानीची पोलीस कोठडी आज संपत असल्यानं चेनानीला कोर्टात हजर करण्यात आलं

- थोड्याच वेळात सुनावणीला होणार सुरुवात

- अश्विनी चेनानीला आज पुन्हा पोलीस कोठडी देण्यात येणार की न्यायालयीन कोठडीत रवानगी होणार, याकडे लक्ष

कल्याण-नगर महामार्गावर झालेल्या भीषण अपघात प्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक

कल्याण नगर महामार्गावर झालेल्या भीषण अपघाता नंतर आता राजकीय वातावरण तापले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट आक्रमक झाला आहे. या अपघाताच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेतील गंभीर त्रुटींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

कल्याणमध्ये वाहतूक शाखेच्या कार्यालयासमोरच टैक्सी चालकांकडून क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक केली जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

जळगावचा पारा ४२.६ अंशां पेशा अधिक, दुपारी रस्त्यावर शुकशुकाट

सकाळी ११ वाजता ३६, दुपारी ३ वाजता ४२, संध्याकाळी ६ वाजता ४० होते तापमान

जळगाव जिल्ह्यातील निसर्गानेही रौद्र रूप धारण केल्याने उन्हाचा तडाखा वाढला होता. शहरात आज तापमान ४२.६ नोंदवले गेले पण प्रत्यक्ष तापमानापेक्षा शरीराला जाणवणारी झळ ( तापमान) तब्बल ४४.६ अंशांपर्यंत पोहोचले दुपारच्या वेळी अक्षरश होरपळवून टाकणाऱ्या झळा लागत आहे

आज सकाळी ८ वाजता ३० अंश पासून सुरू झालेला उन्हाचा पारा दुपारी ३ वाजेपर्यंत ४२ अंशांवर पोहोचला मात्र खरी भीषणता दुपारी दिसून. आली. या वेळी प्रत्यक्ष तापमान ४२.६ अंशांवर गेले

तळेगाव दाभाडे कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त

मावळ तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घडलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडींमध्ये अखेर समिती बरखास्त होऊन प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली असून, या संपूर्ण प्रकरणात आमदार सुनील शेळके यांची मोठी राजकीय खेळी यशस्वी ठरल्याची चर्चा रंगली आहे

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीमध्ये झळकले औरंगजेबाचे बॅनर

छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा औरंगजेबाचे फोटो एका तरुणाने झळकावले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीत एका तरुणाने हा फोटो झळकवला आहे. तसेच हाच व्हिडीओ इन्स्टाग्रामवर देखील अपलोड केला आहे. या प्रकरणी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी आक्षेप घेतला असून, याप्रकरणी पोलीस आयुक्त यांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

जालन्यात समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बस आणि भंगार घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात

जालन्यात समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बस आणि भंगार घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात घडला आहे.

समृद्धी महामार्गावरील केळीगव्हाण गावाजवळ ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॅव्हल्स बसने पाठीमागून भंगार घेऊन जाणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रॅव्हल्समधील सुमारे 10 ते 12 प्रवासी जखमी झाले आहेत.

पहलगाम हल्ल्याचा धाक दाखवत डिजिटल अरेस्टच्या नावाखाली ८२ वर्षीय आजींना ७३.३० लाखांचा गंडा

कल्याण मध्ये अत्यंत धक्कादायक सायबर गुन्ह्याची घटना समोर आली आहे. पहलगाम हल्ल्या’चा धाक दाखवत सायबर भामट्यांनी ८२ वर्षीय आजींना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ७३.३० लाख रुपयांना गंडा घातला आहे.

अमरावतीतील परतवाडा इथल्या लैंगिक शोषण प्रकरणात एसआयटी स्थापन

  • परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणी पोलिस अधीक्षक यांच्याकडून ११ पोलिस अधिकारी व ३६ अंमलदारांचे विशेष तपास पथक (S.I.T.) स्थापन

  • परतवाडा प्रकरणाचा एसआयटी मार्फत केला जाणार तपास

  • शुभम कुमार सहाय्यक पोलीस अधीक्षक तपास पथकाचे मुख्य प्रमुख असणार

पुणे- मार्च महिन्यात १८०० पीएमपी बस पडल्या बंद प्रवाशांना मनस्ताप

  • पीएमपीच्या बसचे मार्च महिन्यात ब्रेकडाउनचे प्रमाण प्रचंड वाढल्याचे दिसत आहे.

  • मार्च महिन्यात १८०१ बस मार्गावर बंद पडल्या असून,फेब्रुवारी पेक्षा ब्रेकडाउन ४०० ने वाढले आहे.

  • ठेकेदारांच्या बस बंद पडण्याचे प्रमाण वाढले असून,प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

  • पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीडच्या हद्दीत पीएमपीचे एकूण ३८१ मार्ग आहेत.

भाजपाकडून महिलांचा केवळ वापर, महिला आरक्षण हे षडयंत्र - खासदार प्रणीत शिंदे

महिला आरक्षणाच्या नावाखाली भाजपाला डी लिमिटेशन आणायचं आहे.

महिलांचा वापर करून भाजपा काहीतरी वेगळंच करत आहे,असा आरोप काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे.

जालन्यातील जेईएस महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी विरोधात ABVP चे आत्मसन्मान आंदोलन

  • जेईएस महाविद्यालच्या प्राचार्यांनी ABVP संघटनेविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप

  • जेईएस महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन

  • जेईएस महाविद्यालयाच्या प्राचार्यांना पदावरून हटवाब ABVP संघटनेची मागणी

भोसरी फ्री स्टाईल हाणामारी, तीन-चार जणांनी एका तरुणाला बेदम केली मारहाण

पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी परिसरात काही वेळापूर्वी तरुणाच्या एका टोळक्यात जोरदारा फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. लांडेवाडीतील एका दुकानाबाहेर तीन तरुणांनी मिळुन एका तरुणाला लाथा बुक्याने बेदम मारहाण केली आहे. मात्र तरुणाचा टोळकं आप आपसात का हाणामारी करत होता हे मात्र समजू शकलं नाही.

शेअर बाजारात पैसे दुप्पट करण्याच्या आमिषाने ४७ लाखांची फसवणूक,राजस्थानहून आरोपी अटकेत

कल्याणमध्ये शेअर बाजारात गुंतवणूक करून अल्पावधीत पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवत एका व्यक्तीची तब्बल ४७ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी राजस्थानमधून एका आरोपीला अटक केली असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Pune: पुण्यात फेसबुक लिंकवरून सव्वा कोटींचा गंडा

फेसबुकवर आलेली लिंक ओपन करून व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करणे एका ५८ वर्षीय नागरिकाला चांगलेच महागात पडले.

जादा परताव्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी त्यांची एक कोटी २२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी सायबर पोलिस स्टेशनमध्ये विविध बँक खातेधारकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सायबर चोरट्यांनी सुरुवातीला फिर्यादीच्या फेसबुकवर लिंक पाठवली. त्यांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी करून विश्वास संपादन केला.त्यानंतर चोरट्यांनी फिर्यादीला वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे भरण्यास भाग पाडले.

ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीत ही रक्कम उकळण्यात आली.मात्र कोणताही परतावा न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

अधिक तपास सायबर पोलिस करत आहेत.

Amravati: अमरावती लैंगिक शोषण प्रकरणातील ४ आरोपींना अटक

अमरावतीच्या परतवाड्यातील अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करून व्हिडिओ व्हायरल केल्याचे प्रकरण...

घटनेच्या निषेधार्थ अमरावती जिल्ह्यात संतप्त पडसाद..

आज अचलपुर -परतवाडा शहरातील बाजारपेठ बंद....

सर्वपक्षीय आणी सामाजिक संघटनेकडून अचलपूर परतवाडा बंदचा निर्णय..

आरोपी विरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी....

आतापर्यंत या संपूर्ण प्रकरणांमध्ये चार आरोपींना पोलिसांनी घेतलं ताब्यात....

दुपारी एक वाजता राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे अमरावती पोलीस महानिरीक्षकांची घेणार भेट

या संपूर्ण प्रकरणाची एस आय टी मार्फत चौकशी ची करणार मागणी

Nandurbar: नंदुरबारमध्ये उन्हाचा तडाखा वाढला; तापमान 42 अंशावर...

नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा दिवसंदिवस वाढत चालला आहेत, सर्वाधिक तापमानाची नोंद आज झाली असून आजच्या तापमान 42 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचला आहे तर येणारे काही दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असून तापमानाचा पारा अधिक वाढणार आहे तापमानाच्या पारा अधिक वाढत असल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याच्या आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे यावर्षी तापमानाच्या कहर पाहायला मिळून येत आहे तर यावर्षी अधिक तापमान राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे तापमान अधिक असल्याने बर्फ पासून आणि लिंबूचे पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे तर अति महत्त्वाचे काम असल्यास बाहेर पडताना नागरिकांनी काळजी घेण्याचा अहवाल प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

Wardha: जगातील उष्ण शहरांच्या यादीमध्ये वर्ध्याचा समावेश

जगातील उष्ण शहरांच्या यादीत वर्धा जिल्ह्याचा समावेश झाला असुन उष्ण शहरांच्या यादीमध्ये वर्धा जगातून सातव्या क्रमांकावर आल्याची माहिती समोर येत आहे. आता आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहेय. सोबतच नागरिकांसाठी प्रशासनाने खबरदारी साठी काही मार्गदर्शक सूचना सुद्धा दिल्या आहेत. 16 एप्रिल ते 19 एप्रिल या कालावधीत येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उन्हाच्या जोरदार झळा वर्धा जिल्हावासी यांना सोसाव्या लागत आहे.

MIM ची मुंब्र्यातील नगरसेविका सहर शेखचे नगरसेवक पद धोक्यात

- कैसे हराया फेम गर्ल यांचे नगरसेवक पद धोक्यात ⁠

- ⁠⁠ठाणे तहसीलदार उमेश पाटील यांचा अहवाल आहे

- ⁠सहर शेख आणि वडील युनुस शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची करण्यात आलीये शिफारस

- ⁠तहसीलदार उमेश पाटील यांनी केली शिफारस

- ⁠उपविभागीय जिल्हाधिकारी ठाणे आणि कोकण विभाग जातपतडताळणी समिती केली शिफारस

- ⁠सहरचे वडील यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याची करण्यात आली होती तक्रारार

- ⁠सिद्दीकी अहमद या व्यक्तीने केली होती तक्रारार

- ⁠प्रथमदर्शनी तपासात आले समोर

चिपळूणमध्ये गवा रेड्याचं दर्शन

रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गवा रेड्यांचा वावर सध्या वाढला आहे.. चिपळूण तालुक्यातील भिले गावातही गवा रेडे दिसू लागले आहेत.. भिले गावातील भोईवाडी बंदर परिसरात संध्याकाळच्या सुमारास गवा रेड्याचं दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.. जंगलातून हा गवा रेडा अन्नाच्या आणि पाण्याच्या शोधात लोकवस्तीजवळ आला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान या परिसरात लोकांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते, त्यामुळे वनविभागाने तातडीने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

नांदेडच्या आंबेगावात बिबट्याचा जनवरावर हल्ला

नांदेडच्या अर्धापुर तालुक्यात बिबट्याचा वावर वाढला असून आंबेगाव शिवारामधील शेतकरी नवनाथराव देशमुख यांच्या आखाड्यावर बांधलेल्या जनावरावर बिबट्याने मध्यरात्री हल्ला केलाय.सालगड्याने आरडावोरड केल्याने बिबट्या पळाला.या परिसरात बिबट्याने अनेक जनावरावर यापूर्वी सुद्धा हल्ला केला आहे.बिबट्याच्या भीतीमुळे शेतावर काम करण्यास कामगार टाळाटाळ करीत आहेत. वनविभागाने बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

बारामती : बारामती पवार कुटुंबीय उतरले मैदानात

बारामती विधानसभेची पोटनिवडणूक होत असून अजित पवार गटाकडून उपमुख्यमंत्री सुननेत्रा पवार उमेदवार आहेत निवडणूक लढवीत आहेत. सुनेत्रा पवार यांना शरद पवार गटाने पाठिंबा दिला असून आज पासून संपूर्ण पवार कुटुंबीय प्रचारात उतरले आहेत रोहित पवार आज ठिकठिकाणी सभा घेणार आहेत.

मुंबईतील व्यावसायिक केशवानंद शिरोडकर यांची 1.13 कोटींची फसवणूक

अखेर फरार आरोपी डॉ . सय्यद शेख फाजील नूर सय्यद एम एच बी कॉलनी पोलिसांच्या ताब्यात

भारत CSR कंपनीचा मालक” असल्याचे भासवून विश्वास संपादन

ऐन उन्हाळ्यात पाण्याचा झरा

उष्णतेचा पारा सध्या वाढू लागला आहे, अनेक ठिकाणी जलसाठ्याचे नैसर्गिक स्रोतही आटले आहेत.. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यातील शिपोशी गावातल्या जाधववाडी येथील डोंगरभागात असणाऱ्या एका झऱ्यातून भर उन्हाळ्यात पाणी वाहू लागलं आहे.. या पाण्याचा उपयोग रानातील पशु पक्षी यांना होत आहे.. यापूर्वी देखील दोन ते तीन वेळा भर उन्हाळ्यात या झऱ्यातून पाणी वाहू लागलं होतं.. आता देखील ऐन उन्हाळ्यात या झऱ्यातून पाणी वाहू लागल्याने जंगलातील पशु, पक्षी, जनावरे यांना या पाण्याचा मोठा आधार मिळत आहे..

गणेगाव दुमाला चौकात दोन दुचाकींची धडक; अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील गणेगाव दुमाला येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक परिसरात चारही बाजूंनी रस्ते असलेल्या चौकात दोन दुचाकींची जोरदार धडक होऊन एक चालक जखमी झाला आहे. या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

बैलांच्या खाद्यातून पोटात जातात लोखंडी वस्तू; चुंबकाने काढण्याचा धोकादायक ‘उपाय’

उत्तर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पशुधनाला दिल्या जाणाऱ्या खाद्यातून लोखंडी तुकडे, खिळे, तारांचे तुकडे थेट जनावरांच्या पोटात जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. त्यामुळे बैल आणि इतर पशुधनाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून, आता यावर काही ठिकाणी चुंबक वापरून लोखंड बाहेर काढण्याचा धोकादायक उपाय केला जात असल्याचंही समोर आलंय.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु दोन दिवस नागपूर दौऱ्यावर

- आज सकाळी 11 वाजता एम्सच्या द्वितीय दीक्षांत समारोहास मुख्य अतिथी म्हणून राष्ट्रपती उपस्थित असतील

- तर संध्याकाळी चार वाजून पन्नास मिनिटांनी राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी येथे आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यास मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असणार

- उद्या राष्ट्रपती वर्ध्याच्या सेवाग्राम मधील गांधी आश्रमाला भेट देणार

- राष्ट्रपती सोबतच राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे देखील नागपूर दौऱ्यावर असतील.

पुण्यात तापमानाचा पारा ओलांडणार चाळीशी

पुणे आणि अस्पताच्या परिसरात पुढील तीन ते चार दिवस आकाश मुख्यत निरभ्र राहण्याची शक्यता आहे परंतु पुण्यातील शिवाजीनगर पाषाण चिंचवड मगरपट्टा कोरेगाव पार्क येथील कमल तापमानाचा पारा 40°c आणि त्यापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे पुणे पाषाण चिंचवड मगरपट्टा कोरेगाव पार्कमध्ये बुधवारी कमाल 41 अंश सेल्सिअस तर लोहगाव येथील कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस वाढण्याची शक्यता आहे.

नाशिकमधील म्हाडा घोटाळ्याबाबत आज SIT ची पहिली बैठक

- राज्य शासनाकडून घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी समितीची झालीय स्थापना

- नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली SIT काम करणार

- SIT ची पहिली बैठक आज होणार, संबंधित यंत्रणांकडून सर्व माहिती मागवली जाणार

- त्यानंतर प्रत्यक्ष चौकशीला सुरुवात होणार

- आर्थिक दुर्बल घटकांसाठी असलेल्या घरांमध्ये नियमभंग झाल्याची शक्यता

- विकसक आणि काही शासकीय यंत्रणा ‘रडार’वर

शरद मोहोळ खूनप्रकरणी आरोपी वकिलाचा जामीन फेटाळला

कुख्यात गुंड शरद मोहोळ खूनप्रकरणी आरोपी वकील संजय उधाण यांचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला. गुन्ह्यातील कटात सहभाग व आरोपींना मदत केल्याचे प्रथमदर्शनी पुरावे आढळल्याचे न्यायालयाने नमूद केले. घटनेनंतर उधाण यांनी मुख्य आरोपींसोबत संपर्क साधून त्यांना पळून जाण्यास मदत व पुरावे नष्ट करण्याचा सल्ला दिल्याचा आरोप आहे.

सोनसाखळी चोराला नेरळ पोलिसांनी ठोकल्या बेड्या

महिलांच्या गळ्यातील मंगळसुत्र आणि सोनसाखळ्या चोरणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला नेरळ पोलिसांनी जेरबंद केलं आहे. त्याच्याकडून सुमारे १ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. प्रवीण पाटील असे या आरोपीचे नाव असून त्याने कर्जत तालुक्याबरोबरच ठाणे जिल्ह्यातही असे गुन्हे केले आहेत. आतापर्यंत 12 गुन्हे उघडकीस आले असून आणखी काही गुन्ह्यांचा तपास लागण्याची शक्यता आहे.

नेरळ माथेरान रस्त्यावर बिबट्याचा मुक्त संचार

नेरळ माथेरान रस्त्यावर बिबट्याच दर्शन झाले आहे. बिबट्या रस्त्यावर मुक्त संचार करीत असतानाचा व्हिडिओ येथील टॅक्सी चालकाने मोबाईलमध्ये चित्रित केला आहे. रस्त्यावर मुक्तपणे संचार करीत रस्त्यावरील कठड्यावरून हा बिबट्या दरीत उतरला. माथेरानच्या जंगल भागात बिबट्याच्या वास्तव्याच्या चर्चा होत्या, रस्त्यावर मुक्त संचार करणाऱ्या या बिबट्यामुळे पुन्हा एकदा माथेरानमधील बिबट्याचे वास्तव्य अधोरेखीत झाले आहे.

akola : अकोल्यात घरगुती गॅस सिलेंडरचा ब्लास्ट

अकोल्यात घरगुती गॅस सिलेंडरचा ब्लास्ट होऊन भीषण आग. अकोला शहरातील चिखलपुरा परिसरात टीनाच्या घराला भीषण आग. स्थानिक नागरिकांच्या प्रयत्नांनी आली आग आटोक्यात. चिखलपुरा परिसरातील नागसेन ऐका घराला घरगुती गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे ही आग आहे. बंडू इंगळे यांच्या घरातील गॅस सिलेंडरने पेट घेतल्याचे समजताच कुटुंबंयांनी घराबाहेर पळ काढला.. तितक्यात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन ही आग लागलीय... स्थानिक नागरिकांनी अथक प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश आलंये.. यात सुदैवाने कुठलेही जीवितहानी झाली नाहीए, मात्र इंगळे कुटूंबीयांची संसाराची राख रांगोळी होत संसार उघड्यावर पडलाय...

Maharashtra News Live Update: ठाण्यात शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आपापसात भिडले

- ⁠निवडणूकीच्या काळात तिकीट मिळणे तसंच तिकिट मिळण्यावरुन झालेला वाद या मारामारीचे कारण असल्याची चर्चा

- ⁠तसंच निवडणूकीत विरोधात काम केल्याचा राग मनात धरुन भांडणे झाल्याचा पोलिसांना संशय

- ⁠पदाधिकारी नरेंद्र मालुसरे यांच्यावर शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची तक्रार दाखल

- याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल झालाय

हिंगोलीत भीम जयंतीच्या मिरवणूकीचा उत्साह, हिंगोलीत अभूतपूर्व भीमसैनिकांची गर्दी

हिंगोलीत रात्री बारा वाजेपर्यंत भीम जयंतीचा उत्साह पाहायला मिळाला आहे जिल्ह्यातील पाचही तालुक्यात ढोल ताशाच्या गजरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भीमसैनिकांनी मोठ्या उत्साहात व शांततेत साजरी केली आहे हिंगोली शहरातील संविधान कॉर्नर परिसरात भीमसैनिक डीजे आणि ढोल ताशाच्या गजरात थिरकताना पाहायला मिळाले, या जयंती मध्ये महिला व चिमुकल्यांनी देखील मोठा सहभाग नोंदवला होता तर मिरवणूक संपेपर्यंत हिंगोली चे पोलीस अधीक्षक निलाव रोहन मिरवणूक परिसरात रात्री उशिरापर्यंत लक्ष ठेऊन होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com