Chhattisgarh Crime news Saam Tv
क्राईम

Shocking: कहरच! मुलीवर बलात्कार करणार्‍याच्या प्रेमात पडली आई, लेकीला सोडलं अन् नराधमासोबत थाटला संसार

Chhattisgarh Crime: छत्तीसगडमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना घडली. मुलीवर बलात्कार केलेल्या नराधमाच्या प्रेमात आई पडली. तिने या तरुणासोबत संसार थाटला. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली.

Priya More

Summary:

  • छत्तीसगडमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार

  • पीडित मुलीच्या आईने आरोपीला दिली साथ

  • आरोपीच्या प्रेमात पीडित मुलीची आई पडली

  • मुलीला सोडून देत आईने आरोपीसोबत थाटला संसार

छत्तीसगडमधील जशपूर जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली. तरुणाने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. पीडितेच्या आईने मुलीला सोडून आरोपीला पाठिंबा दिला. त्या तरुणासोबत तुझे लग्न लावून देते असे म्हणत आईने मुलीला गप्प बसायला लावले. नंतर आईने मुलीला सोडून दिले आणि स्वतः आरोपीशी लग्न केले. याप्रकरणी पीडित मुलीने पोलिस ठाण्यात धाव घेत आई आणि बलात्कार केलेल्या तरुणाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.

१८ वर्षांच्या तरुणीने वडिलांसोबत पोलिस ठाण्यामध्ये धाव घेत तक्रार दाखल केली. पीडित तरुणीने आरोप केला की, ती अल्पवयीन असताना तिच्यावर एका तरुणाने बलात्कार केला होता. तिच्या आईने आरोपीला संरक्षण दिले आणि त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर तिने त्याच्यासोब लग्न करून खलीलाबाद शहरात राहायला गेली. दोघांमुळे ३ वर्षे पीडित तरुणीला मानसिक आणि शारीरिक त्रास झाला.

२०२१ मध्ये पीडित तरुणीच्या आईने आरोपी तरुणाविरोधात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी आरोपीविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण सध्या कोर्टात गेले असून आरोपी फरार आहेत. आरोपीविरोधात अटक वॉरंट देखील काढण्यात आले आहे. पीडित तरुणीने दावा केला की, तिची आई आरोपीसोबत राहते. तिने त्याच्यासोबत लग्न केले. तरुणीने असेही सांगितले की, आरोपीने ती अल्पवयीन असताना तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला आणि प्रकरण मिटवण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला गेला. जेव्हा तिने विरोध केला तर मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला होता. ती मदतीसाठी ओरडत राहिली. पण तिच्या आईने काहीच ऐकले नाही.

पीडित तरुणीचे वडील त्यावेळी मुंबईत काम करत होते. ऑक्टोबर २०२५ मध्ये ते जेव्हा घरी परत आले तेव्हा पीडित मुलगी आरोपीच्या तावडीतून सुटली. त्यानंतर तिने वडिलांना हे संपूर्ण प्रकरण सांगितले. त्यानंतर तिने वडिलांसोबत २७ ऑक्टोबरला पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. तर तिच्या वडिलांनाच एका जुन्या प्रकरणात अडकवण्यात आले. ५ नोव्हेंबरला तिच्या वडिलांना अटक करण्यात आली. तरुणी न्यायासाठी धडपड करत होती. शेवटी २ डिसेंबरला तिच्या वडिलांची सुटका झाली. त्यानंतर तिच्या वडिलांनी पुन्हा पोलिस ठाण्यात धाव घेत आरोपी आणि बायकोविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोघांविरुद्ध पोक्सो कायदा आणि बलात्काराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आणि त्यांना अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane : ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! घोडबंदर रोडवर पुढील ३ दिवस या वाहनांना बंदी; वाचा संपूर्ण माहिती

Maharashtra Live News Update: पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलची तोडफोड

Sindhudurg: आईच्या फोनवरून मेसेज, भेटायला बोलावलं; धरणात आढळले प्रेमी युगुलाचे मृतदेह, नेमकं काय घडलं?

SBI Har Ghar Lakhpati Scheme: स्टेट बँकेची हर घर लखपती योजना! महिन्याला फक्त ५९१ रुपये गुंतवून मिळणार लाखो रुपये

Municipal Elections : महापालिका निवडणुकीला मुहूर्त कधीचा? महत्त्वाची तारीख आली समोर, वाचा लेटेस्ट अपडेट

SCROLL FOR NEXT