Chhatrapati Sambhajinagar Latest News:  Saamtv
क्राईम

Chhatrapati Sambhajinagar Crime: गाडीचा कट लागल्याने दोन गटात राडा, मारहाणीत ४ जण जखमी; छत्रपती संभाजीनगरमधील घटना

Chhatrapati Sambhajinagar Latest News: छत्रपती संभाजीनगरच्या अंगूरी बाग परिसरात रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास गाडीचा कट मारल्यावरून तरुणांमध्ये हाणामारीचे प्रकार समोर आला आहे. त्यामुळे काही वेळ या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

Gangappa Pujari

छत्रपती संभाजीनगर|ता. २३ जून २०२४

दुचाकीचा धक्का लागल्याने दोन गटात वाद होऊन तुफान हाणामारी झाल्याची घटना छत्रपती संभाजीनगर शहरात घडली. या मारहाणीत चार जण गंभीर जखमी झालेत. या जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगरच्या अंगूरी बाग परिसरात रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास गाडीचा कट मारल्यावरून तरुणांमध्ये हाणामारीचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे काही वेळ या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन राडा करणाऱ्या तरुणांना हुसकावून लावले.

यामध्ये मोटरसायकलवर असलेले चौघेजण जखमी झाले असून त्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी टोळक्यावर हल्ला केला. त्यामध्ये काहीजण किरकोळ जखमी झाले असून, त्यांच्यावर सध्या घाटी रुग्णाला उपचार सुरू आहे. सध्या शहरात शांतता असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

दरम्यान, गाडीचा कट लागल्याने हा वाद झाला होता. या प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करु, कोणालाही कायदा हातात घेऊ देणार नाही, असे पोलीस उपायुक्त नितीन बगाटे म्हणालेत. तसेच परिसरातील तरुणांनी, रात्री उशिरापर्यंत बाहेर बसू नये. यामुळे अनेकवेळा विनाकारण वाद होऊन मोठ्या घटना घडतात. त्यामुळे रात्री ११ पर्यंतच घराबाहेर बसावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी यांच्यावर खुनी हल्ला

Morning Yoga Poses: दररोज सकाळी फक्त १५ मिनिटे करा योगा, संपूर्ण दिवसभर राहाल फ्रेश

Special Report : वादाचा नवा अंक...मंत्री महाजनांची हकालपट्टी करा; आंबेडकरप्रेमी आक्रमक

Arijit Singh Retirement : मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का; अरिजीत सिंगने रिटायरमेंट घेतली, प्लेबॅक सिंगर म्हणून गाणार नाही

Union Budget 2026-27 : यंदाचा अर्थसंकल्प ऐतिहासिक, पहिल्यांदाच...; लाइव्ह अपडेट्स कधी आणि कुठे बघाल?

SCROLL FOR NEXT