Uddhav Thackeray: निवडणूक आयोगावरील टीका उद्धव ठाकरेंना भोवणार? दावा खोटा ठरल्यास कारवाईची शक्यता, पाहा VIDEO

Maharashtra Loksabha Election 2024: मुंबईमधील मतदानादिवशी उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर जाणीवपूर्वक संथगतीने मतदान होत असल्याचा आरोप केला होता. या आरोपांची शहानिशा होणार आहे.
Uddhav Thackeray: निवडणूक आयोगावरील टीका भोवणार? उद्धव ठाकरेंच्या 'त्या' आरोपांची शहानिशा होणार; दावा चुकल्यास कारवाईची शक्यता, VIDEO
Uddhav Thackeray Saam TV
Published On

गिरीश कांबळे| मुंबई, ता. २३ जून २०२४

देशभरात नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या. २० मे रोजी मुंबईमध्ये संथ गतीने मतदान होत असल्याचा तसेच मतदारांची अडवणूक केली जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला होता. ठाकरेंच्या या आरोपांची शहानिशा करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने अहवाल मागितला असून आरोप खोटे निघाल्यास उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील पाचव्या टप्यात २० मे रोजी मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक जिल्ह्यांत मतदान पार पडले होते. त्यावेळी अनेक मतदारसंघात विशेषत: मुंबई, ठाण्यात संथ मतदानामुळे मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी तीव्र उन्हाळा असूनही मतदारांसाठी आयोगाने कोणतीही व्यवस्था केली नसल्याचा आरोप केले होते.

त्याचदिवशी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर जाणीवपूर्वक संथगतीने मतदान होत असल्याचा आरोप केला होता. ठाकरे यांच्या या आरोपावर नाराजी व्यक्त करीत मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांनी ठाकरे यांच्यावर कारवाईची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगानेही याप्रकरणी अहवाल मागवला आहे.

Uddhav Thackeray: निवडणूक आयोगावरील टीका भोवणार? उद्धव ठाकरेंच्या 'त्या' आरोपांची शहानिशा होणार; दावा चुकल्यास कारवाईची शक्यता, VIDEO
Dombivli Accident: मालकाने गाडी दिली, क्लिनरने भरधाव पिकअप चालवत तरुणाला उडवले, झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा दुर्दैवी अंत; ८ दुचाकीनांही धडक

मुंबई उपनगर तसेच ठाणे जिल्हा परिसरातून हा अहवाल मागवला आहे. ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत उल्लेख केलेल्या भागात खरोखरच मतदान संथ होते का? मतदारांच्या रांगा लागल्या होत्या का? मतदारांची अडवणूक केली जात होती का? नेमकी वस्तुस्थिती काय होती याबाबत हा अहवाल मागविण्यात आला आहे. आरोपांची शहानिशा केल्यावर जर आरोप चुकीचे असतील तर उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाईची शक्यता आहे.

Uddhav Thackeray: निवडणूक आयोगावरील टीका भोवणार? उद्धव ठाकरेंच्या 'त्या' आरोपांची शहानिशा होणार; दावा चुकल्यास कारवाईची शक्यता, VIDEO
Buldhana Crime: ज्वेलर्स मालकावर जीवघेणा हल्ला! चाकूने वार, डोळ्यात मिरची पूड टाकून दागिने लुटण्याचा प्रयत्न; बुलढाणा हादरलं

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com