Dombivli Accident: मालकाने गाडी दिली, क्लिनरने भरधाव पिकअप चालवत तरुणाला उडवले, झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा दुर्दैवी अंत; ८ दुचाकीनांही धडक

Dombivli Latest News: राज्यात गेल्या काही दिवसांपासून हिट अँड रनच्या अनेक घडना समोर येत आहेत. पुण्यातील पोर्शे अपघात तसेच नागपूरमधील घटना चर्चेत असतानाच डोंबिवलीमधून एक भीषण अपघात समोर आला आहे.
Dombivli Accident News: मालकाने गाडी हातात दिली, क्लिनरने भरधाव पिकअप चालवत तरुणाला उडवले; झोमॅटो बॉयचा दुर्दैवी अंत; ८ दुचाकांनाही धडक
Dombivli Crime Newssaam tv

अभिजीत देशमुख, कल्याण|ता. २३ जून २०२४

पिकअप टेम्पो ड्रायव्हरने क्लिनरकडे चालवायला दिल्यानंतर भीषण अपघात झाल्याची घटना डोंबिवलीमध्ये घडली. भरधाव पीकअपने झोमॅटो बॉयला फरफटत नेले, या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला असून सात ते आठ गाड्यांचे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात असून चालक तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे.

Dombivli Accident News: मालकाने गाडी हातात दिली, क्लिनरने भरधाव पिकअप चालवत तरुणाला उडवले; झोमॅटो बॉयचा दुर्दैवी अंत; ८ दुचाकांनाही धडक
Buldhana Crime: ज्वेलर्स मालकावर जीवघेणा हल्ला! चाकूने वार, डोळ्यात मिरची पूड टाकून दागिने लुटण्याचा प्रयत्न; बुलढाणा हादरलं

डोंबिवलीतील खोणी पलावा परिसरात काल रात्रीच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. गाड्या धुण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याची वाहतुक करणारा पिकअप टेम्पो चालकाने आपल्या क्लिनरला चालवायला दिली. क्लिनरने टेम्पो भरधाव वेगाने चालवत रस्त्यावर उभ्या असलेल्या एका झोमेटो कर्मचाऱ्याला जोरदार धडक दिली.

या धडकेत या झोमॅटो डिलिव्हरी बॉय काही अंतरापर्यंत फरफटत गेला. ज्यामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सौरभ यादव असे मृत तरुणाचे नाव आहे. इतकेच नाही टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगत असलेल्या सात ते आठ दुचाकींनाही या टेम्पोने धडक दिली .या अपघातानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात जमाव जमा झाला होता.

Dombivli Accident News: मालकाने गाडी हातात दिली, क्लिनरने भरधाव पिकअप चालवत तरुणाला उडवले; झोमॅटो बॉयचा दुर्दैवी अंत; ८ दुचाकांनाही धडक
Amravati News : खासदार बळवंत वानखेडे यांच्यासह १५ जणांविरोधात गुन्हा; जनसंपर्क कार्यालयाचं कुलूप तोडणं भोवलं

घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी धाव घेत टेम्पोचा क्लिनर अतिष जाधव याला ताब्यात घेतले. या अपघातात एका निष्पाप तरुणाचा बळी गेला तर सात ते आठ गाड्यांचे नुकसान झाले . त्यामुळे क्लीनरसह टेम्पो मालकाविरोधात देखील गुन्हा दाखल करत कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Dombivli Accident News: मालकाने गाडी हातात दिली, क्लिनरने भरधाव पिकअप चालवत तरुणाला उडवले; झोमॅटो बॉयचा दुर्दैवी अंत; ८ दुचाकांनाही धडक
Maharashtra Politics: विधानसभेसाठी 'तुतारी' वाजली, शरद पवारांची खास रणनिती; विश्वासू शिलेदारांकडे सोपवली महत्वाची जबाबदारी, पाहा VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com