Amravati News : खासदार बळवंत वानखेडे यांच्यासह १५ जणांविरोधात गुन्हा; जनसंपर्क कार्यालयाचं कुलूप तोडणं भोवलं

Amravati Politics News : अमरावतीचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे आणि काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्यासह इतर १५ जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे
खासदार बळवंत वानखेडे यांच्यासह १५ जणांविरोधात गुन्हा; जनसंपर्क कार्यालयाचं कुलूप तोडणं भोवलं
Amravati Politics NewsSaam TV

अमर घटारे, साम टीव्ही

अमरावतीचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे आणि काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्यासह १५ जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या खासदार जनसंपर्क कार्यालयाचे कुलूप तोडून जबरदस्तीने ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे अमरावतीत काँग्रेस विरुद्ध भाजप असा राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

खासदार बळवंत वानखेडे यांच्यासह १५ जणांविरोधात गुन्हा; जनसंपर्क कार्यालयाचं कुलूप तोडणं भोवलं
Pune Accident VIDEO: पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; आमदाराच्या पुतण्याने दोघांना कारखाली चिरडलं

अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात परिसरात खासदार जनसुविधा कार्यालय आहे. आतापर्यंत या कार्यालयाचा वापर नवनीत राणा करत होत्या. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांना राणा यांचा पराभव केला. अमरावतीच्या खासदारपदी निवडून आल्यानंतर हे कार्यालय आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी बळवंत वानखेडे यांनी प्रशासनाकडे केली होती.

मात्र, वारंवार विनंती करूनही प्रशासनाने कार्यालयाचा ताबा देण्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप बळवंत वानखेडे यांनी केली. शनिवारी दुपारी खासदार वानखेडे, आमदार यशोमती ठाकूर हे काँग्रेस कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले. त्यांनी कुलूप तोडून जबरदस्तीने खासदार कार्यालय ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला.

यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि यशोमती ठाकूर यांच्यात चांगलाच वाद झाला. नवीन खासदाराचा सन्मान केला जात नाही. हे सर्व खपवून घेतले जाणार नाही. वाटल्यास आमच्यावर गुन्हे दाखल करा, पण आम्ही आज कार्यालयाचा ताबा घेणारच, असे सांगून यशोमती ठाकूर यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मदतीने खासदार कक्षाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

यावेळी परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी खासदार बळवंत वानखेडे, आमदार यशोमती ठाकूर यांच्यासह काँग्रेसच्या १० कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. तसेच या जनसंपर्क कार्यालयाला जिल्हाधिकारी कार्यालयाने पुन्हा सील ठोकले. सध्या जनसंपर्क कार्यालयासमोर बॅरिकेट्स लावण्यात आले असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

खासदार बळवंत वानखेडे यांच्यासह १५ जणांविरोधात गुन्हा; जनसंपर्क कार्यालयाचं कुलूप तोडणं भोवलं
Manoj Jarange Video: 'नोंदी रद्द केल्यास परिणाम भोगावे लागणार', कुणबी नोंदींवरून जरांगेंचा सरकारला इशारा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com