Maharashtra Politics: विधानसभेसाठी 'तुतारी' वाजली, शरद पवारांची खास रणनिती; विश्वासू शिलेदारांकडे सोपवली महत्वाची जबाबदारी, पाहा VIDEO

Maharashtra Vidhansabha Election 2024: लोकसभेत नवा पक्ष, नवे चिन्ह घेऊनही ८० च्या स्ट्राईक रेटने विजय मिळवल्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी विधानसभा निवडणुकांसाठी सज्ज झाली आहे. पुण्यामध्ये झालेल्या बैठकीत विधानसभा निवडणुकांच्या रणनितीसह पक्षातील नेत्यांकडे मोठ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. वाचा सविस्तर....
Maharashtra Politics: विधानसभेसाठी 'तुतारी' वाजली, शरद पवारांची रणनिती ठरली! अमोल कोल्हे, सुप्रिया सुळेंकडे मोठी जबाबदारी| पाहा VIDEO
Maharashtra Vidhansabha Election 2024: Saam TV
Published On

पुणे, ता. २२ जून २०२४

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत १० पैकी ८ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने घवघवीत यश संपादन केले. लोकसभेतील या यशानंतर शरद पवार यांची राष्ट्रवादी विधानसभेलाही गुलाल उधळण्यास सज्ज झाली आहे. एकीकडे मुंबईमध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बैठकांचा धडाका सुरू केला असतानाच पक्षाचे अध्यक्ष शरद पवारही गावोगावी दौरे करत आहेत. याच पार्श्वभूमीवर विधानसभेसाठी पक्षाची नवी फौज तयार करण्यात आली आहे.

विधानसभेची रणनिती!

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची काल पुण्यामध्ये महत्वाची बैठक झाली. आगामी विधानसभा निवडणुकांची रणनिती ठरवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह प्रमुख नेते, नवनिर्वाचित खासदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये विधानसभेसाठी प्रत्येकाला जबाबदारी वाटून देण्यात आली.

कुणाकडे काय जबाबदारी?

पक्षाच्या प्रत्येक खासदाराकडे त्यांच्या मतदार संघात येणाऱ्या विधानसभेच्या जागेची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे विदर्भाची, राजेश टोपे यांना मराठवाड्याची जबाबदारी देण्यात आली आहे. शिरुरचे खासदार अमोल कोल्हे शिव स्वराज्य यात्रेमधून पुन्हा एकदा महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. तर खासदार सुप्रिया सुळे राज्यभर महिला मेळावे घेणार आहेत.

Maharashtra Politics: विधानसभेसाठी 'तुतारी' वाजली, शरद पवारांची रणनिती ठरली! अमोल कोल्हे, सुप्रिया सुळेंकडे मोठी जबाबदारी| पाहा VIDEO
Manoj Janare News: कुणबी नोंदी रद्द करणं तुम्हाला पेलणार नाही; मनोज जरांगे पाटील खवळले, पाहा VIDEO

काँग्रेसही तयारीला लागली!

दरम्यान, राष्ट्रवादीप्रमाणे महाविकास आघाडीत मोठा भाऊ ठरलेल्या काँग्रेसनेही विधानसभेची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये ते पुण्यातील लोकसभा निवडणुक पराभवाचा आढावा घेणार असून काँग्रेस भवनमध्ये नाना पटोले सर्व स्थानिक नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर नाना पटोले अहवाल घेणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com