Manoj Janare News: कुणबी नोंदी रद्द करणं तुम्हाला पेलणार नाही; मनोज जरांगे पाटील खवळले, पाहा VIDEO

Manoj Jarange on Chhagan Bhujbal : आमच्या ५७ लाख कुणबी नोंदी सापडल्या असून त्यातील एकही नोंद खोटी नाही. सरकारने जर तसं काही केलं, तर त्यांना ते खूपच महागात पडेल, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे
Manoj Jarange on Chhagan Bhujbal
Manoj Jarange on Chhagan BhujbalSaam TV
Published On

राज्य सरकारने ५४ लाख कुणबी नोंदी रद्द करून त्याची लेखी मला द्यावी. तरच मी उपोषण मागे घेतो, अशी मागणी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केली. त्यांच्या या मागणीनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. राज्यात आमच्या ५७ लाख कुणबी नोंदी सापडल्या असून त्यातील एकही नोंद खोटी नाही. सरकारने जर तसं काही केलं, तर त्यांना ते खूपच महागात पडेल, असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. ते छत्रपती संभाजीनगर येथे बोलत होते.

मनोज जरांगे म्हणाले, "आमची एकही नोंद खोटी नाही तरी तुम्ही जाणून बोलून त्यांचा एकूण कारवाई करणार. मंगल आयोगावर सुद्धा कारवाई करा. 1994 ला जे दिले त्याच्यावर कारवाई करा. जे वरचं आरक्षण दिलंय तेही रद्द करा. सध्या तुम्ही हम करे सो कायदा असं करत आहात. मंडल कमिशन रद्द करण्यात तुम्हाला मिळणार नाही असं काही जण म्हणत आहेत. मग तुम्हाला या नोंदी रद्द करणे पेलेल का?", असा सवाल जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.

"गोरगरीब मराठा समाजाची मुलं मोठी झाली पाहिजे त्यासाठी मी लढत आहे. संपूर्ण मराठा समाज एक आला याची सर्वात मोठी पोट दुखी लोकांना होत आहे. काल छगन भुजबळ स्वतः बोलले की ते ओबीसीचे लोक माझे आहे. छगन भुजबळ यांना धनगर आणि मराठा समाज बांधवात भांडणं लावून ते मोकळे होणार आहे आणि ते घरात बसणार आहे. मी तुम्हाला पाच दिवसांपूर्वीच बोललो होतो की हे आंदोलन पुरस्कृत आहे आणि काल ते स्वतः बोलले", अशी टीका जरांगे यांनी केली.

बबनराव तायवडे यांच्यावर बोलताना जरांगे म्हणाले, "माझी भाषा खालच्या पातळीची कशी आहे ते ओबीसी आणि मराठा बांधवात वाद लागू नये. तुम्ही व्यासपीठावर आमच्या माय बहिणीपर्यंत बोलले. त्यावेळी छगन भुजबळ देखील व्यासपीठावर होते. त्यावेळची भाषा तुमच्या लक्षात नाही का. तुम्ही मागची भाषण काढा कोयत्यांनी पाय तोडू असं तुम्ही बोलले होते".

Manoj Jarange on Chhagan Bhujbal
OBC Andolan : मराठ्यांना खुशाल आरक्षण द्या, पण त्यांच्या जमिनी अन् कारखाने आमच्या नावावर करा; ओबीसी बांधव खवळले

"खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं हे तुम्ही तुमचं ठरवा. आम्हाला शिव्या देणारे नाव कोणते आहे हे तुम्हाला सगळं माहिती आहे. मी त्याला सोडू शकत नाही असं म्हणत छगन भुजबळ यांच्यावरती हल्लाबोल केला. त्यानीच हे आंदोलन बसवलेलं आहे आणि ओबीसी आणि मराठा बांधवांमध्ये वाद लावण्याचे काम केले. आम्हाला काहीही फरक पडणार नाही. दोन पालकमंत्र्यांना तुम्ही जवळ घेऊन बसलात ऐनवेळेला आम्ही दाखवून देऊ", असा इशारा जरांगे यांनी भुजबळांना दिला.

"छगन भुजबळ यांनी कितीही विरोध केला तरी मराठ्यांनी मागे हटू नका. सगळ्या जाती एकमेकांच्या अंगावर घालणं, सभेतून खालच्या भाषेत शिव्या द्यावे लावला यासारखे अनेक प्रकारचे छगन भुजबळ करत आहे. विनाकारण धनगर बांधवांनी त्यांचं ऐकून भांडण करून घेऊ नये मराठ्यांच्या विरोधात येऊ नये. तुम्हाला आणि तुमच्या लेकराला आरक्षण मिळाले तेव्हा मी विरोध केला का", असा सवाल जरांगे यांनी केला.

"आमच्या नोंदी सापडल्या सातबारा सापडला आणि तुम्ही म्हणतात देऊ नका. तुम्ही विनाकारण का आमच्या विरोधात जात आहे. तुमच्यावर आम्ही काय अन्याय केला कशामुळे तुम्ही छगन भुजबळ यांच्यामुळे आमच्या विरोधात जात आहात. मी छगन भुजबळ यांना सुट्टी देणार नाही. मी कट्टरपणे हे आंदोलन उभा केलं म्हणून यांची खरे चेहरे आता उघडे पडायला लागले आहे", असंही जरांगे म्हणाले.

Edited by - Satish Daud

Manoj Jarange on Chhagan Bhujbal
Maharashtra Politics : विधानसभेसाठी भाजपची रणनिती ठरली, सागर बंगल्यावर मध्यरात्रीपर्यंत काय चर्चा झाली? पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com