लातूर : हात पाय ताेडण्याची भाषा करत 25 ते 30 जणांकडून पोलिस उपनिरीक्षकास बेदम मारहाण

mob hits police in renapur near latur : न्याय देणाऱ्या पोलिसांनाच न्याय मिळत नसल्यास नागरिकांनी जायचं कुठे असा सवाल रेणापूरच्या पोलिस उपनिरीक्षक हनुमंत घुलेंनी घडलेल्या प्रकारानंतरची माहिती दिल्यावर लातूरमध्ये उपस्थित हाेऊ लागला आहे.
mob hits police in renapur near latur
mob hits police in renapur near latur Saam Digital

- संदीप भाेसले

लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात अवैध मटका चालकाच्या जमावाने कारवाईसाठी गेलेल्या पोलिस उपनिरीक्षक हनुमंत घुले यांना धक्काबुक्की करत बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्याबाबतची तक्रार हनुमंत घुलेंनी पाेलिस ठाण्यात दिली आहे.

mob hits police in renapur near latur
Dharashiv Crime News : धाराशिव जिल्ह्यात भरदिवसा गाेळीबार; वाळू माफियांच्या दाेन गटात राडा

घुले यांनी दिलेल्या माहितीनूसार रेणापूर तालुक्यातल्या कुंभारी पाटी जवळ अवैध मटका अड्डा येथे कारवाईसाठी गेलाे हाेताे. तेथून काही जणांना पळ काढला. त्यानंतर मटका चालकांनी रस्त्यात अडवले. जीवे मारण्याची धमकी देत बेदम मारहाण केली.

mob hits police in renapur near latur
Kolhapur Bandh : कोल्हापुरच्या हद्दवाढीसाठी शहर बंद ठेवू, मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविणार; कृती समितीचा इशारा

दरम्यान याप्रकरणी रेणापूर पोलिस ठाण्यात तक्रार करूनही वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी तक्रार घेतली नाही असा गंभीर आरोप घुलेंनी केला आहे. पोलिस ठाण्यातील अधिकारीच पाेलिसांना न्याय देऊ शकत नसले तर सामान्य नागरिकांचे काय असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

Edited By : Siddharth Latkar

mob hits police in renapur near latur
सांगली जिल्हा बँकेवर प्रशासक? फडणवीसांशी चर्चा, पडळकरांनी स्पष्टच सांगितलं; 25 जूनला चाबूक माेर्चा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com