Chhatrapati Sambhajinagar Crime 
क्राईम

Chhatrapati Sambhajinagar: बदला आणि संपत्तीसाठी काकू बनली भक्षक; एकुलत्या एक पुतण्याला फेकले विहिरीत

Chhatrapati Sambhajinagar Crime: बदला आणि संपत्तीसाठी सख्ख्या काकूनं चुमकल्या पुतण्याचा जीव घेतला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील माटेगाव येथे गेल्या आठवड्यात 4 वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह संशयितरित्या विहिरीत आढळून आला होता.

Bharat Jadhav

रामू ढाकणे, साम प्रतिनिधी

विहिरीत पडून ४ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात मोठा खुलासा झालाय. बदला आणि संपत्तीसाठी सख्ख्या काकूनेच चिमुकल्या पुतण्याचा जीव घेतल्याची बाब समोर आलीय. काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील माटेगावात चार वर्षाच्या मुलाचा विहिरीत पडून मृत्यू झाला होता. खेळताना तो विहिरीत पडला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र या बालकाचा त्याच्या सख्ख्या काकूनेच बदला आणि संपत्तीच्या हव्यासापोटी खून केल्याची माहिती पोलीस तपासात उघड झालीय. सुनीता गणेश जाधव असे काकूचे नाव असून तिला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

माटेगाव येथील गट नंबर 17 मधील शेत वस्तीवर गणेश हिरामण जाधव आणि सागर हिरामण जाधव हे दोघे भाऊ एकत्र राहतात. या दोघांना वडिलोपार्जित 6 एकर जमीन आहे. मोठा भाऊ गणेश यांच्या पत्नीचे नाव सुनीता असून त्यांना 2 मुले आहेत तर लहान भाऊ सागर यांना 1 मुलगा आणि मुलगी आहे. काही दिवसापूर्वी सागर यांचा मुलगा सार्थक याने खेळताना गणेशच्या मुलाच्या डोळ्यात चुना टाकला होता.

त्यामुळे त्याचा डोळा निकामी झाल्याने त्याचा प्रचंड राग सूनिताच्या मनात होता. विशेष म्हणजे काही दिवसापूर्वीच सागरच्या पत्नीचे ऑपरेशन काढून तिची गर्भ पिशवी काढून टाकण्यात आली म्हणजे भविष्यात तिला मूलबाळ होणार नाही याची जाणीव सुनीताला आली आणि तिने सार्थकची हत्या केली.

संपत्तीसाठी सुनेचे निर्दयी कृत्य

संपत्तीसाठी सून आपल्या वृद्ध सासूला जबर मारहाण करत असल्याची घटना सुरतमध्ये घडली होती. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. गुजरातमधील सुरत शहरातील हा व्हिडिओ असल्याचं समोर आलं होतं. घरात सून सासूला पकडून मारहाण करत आहे. धक्कादायक म्हणजे या भांडणात सून सासूचे केस ओढत तिचे गाल चावत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baaghi 4 OTT Release : जबरदस्त ॲक्शन अन् रोमान्सचा धमाका, टायगर श्रॉफचा 'बागी ४' कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार?

Anant Chaturdashi 2025 live updates : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून हेल्पलाइन नंबर जारी

Ganpati Visarjan : पुण्यात गणपती विसर्जनावेळी दुर्घटना, मिरवणुकीदरम्यान दोन जणांना विजेचा शॉक

Maharashtra Live News Update: प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

'दम मारो दम' राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता नशा करण्यात दंग, 'तो' व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT