Viral Video: संपत्तीसाठी लेकाचे राक्षसी कृत्य! जन्मदात्याला लाथा- बुक्क्यांनी बेदम मारहाण; वडिलांचा मृत्यू.. घटना CCTVत कैद

Son Beating Father Viral CCTV Footage: तमिळनाडूमधून अशीच एक संतापजनक अन् मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. तमिळनाडूच्या पेरांबलूर जिल्ह्यात पोटच्या लेकानेच जन्मदात्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Son Beating Father Viral CCTV Footage:
Son Beating Father Viral CCTV Footage: Saamtv

पैसा, जमीन, संपत्तीच्या मोहात अनेकांना नात्याचा विसर पडतो. काळ बदलत गेला तसा नात्यातील जिव्हाळाही कमी झाल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळते. पैशाच्या वादातून, जमिनीच्या वादातून रक्ताची नातीच जिवावर उठल्याची अनेक घटना ऐकायला, वाचायला मिळतात. तमिळनाडूमधून अशीच एक संतापजनक अन् मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. तमिळनाडूच्या पेरांबलूर जिल्ह्यात पोटच्या लेकानेच जन्मदात्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

तामिळनाडूमध्ये 42 वर्षांच्या मुलाने आपल्या वृद्ध वडिलांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या मारहाणीत वडिलांचा मृत्यू झाला. तामिळनाडूच्या पेरांबलूर जिल्ह्यात घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संपत्तीच्या वादातून हा संपूर्ण प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पाहू शकता की, वृद्ध पिता घराबाहेर सोफ्यावर बसल्याचे दिसत आहे. अचानक त्याठिकाणी त्यांचा मुलगा येतो अन् अत्यंत क्रुरपणे आपल्या जन्मदात्याला मारायला सुरूवात करतो. धक्कादायक म्हणजे तो वडिलांच्या पोटात एक जोराची लाथही घालतो, ज्यानंतर ते जाग्यावर कोसळतात. काही वेळाने तरुणाला घरातील इतर व्यक्ती अडवतात.

Son Beating Father Viral CCTV Footage:
Jalana News: नागपूरकडे निघालेल्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग! गावकरी, पोलीस घटनास्थळी दाखल; जालन्यात काय घडलं?

दरम्यान, या प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संतोष नावाच्या आरोपीला भारतीय दंड विधानाच्या कलम ३२३ आणि ३२४ यासह विविध आरोपांनुसार अटक केली आहे. संतोषला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी तरुणाला कडक शिक्षेची मागणी केली आहे.

Son Beating Father Viral CCTV Footage:
Shirur Loksabha Election: अमोल कोल्हे-आढळराव पाटील दोघेही एकमेकांच्या पडले पाया, पाहा व्हिडीओ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com