Jalana News: नागपूरकडे निघालेल्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग! गावकरी, पोलीस घटनास्थळी दाखल; जालन्यात काय घडलं?

Jalana Helicopter Emergency Landing: जालन्यात मल्होत्रा प्रायव्हेट कंपनीच्या एका हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. तपोवन तांडा भागात या हेलिकॉप्टरचं लँडिंग करण्यात आले आहे.
Jalana News: नागपूरकडे निघालेल्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग! गावकरी, पोलीस घटनास्थळी दाखल; जालन्यात काय घडलं?
Jalana Helicopter Emergency Landing: Saamtv

जालना|ता. २९ एप्रिल २०२४

जालन्यात मल्होत्रा प्रायव्हेट कंपनीच्या एका हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. तपोवन तांडा भागात या हेलिकॉप्टरचं लँडिंग करण्यात आले आहे. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने हे लँडिंग झाल्याचे सांगण्यात येत असून विमानातील सर्वजण सुखरुप आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मल्होत्रा प्रायव्हेट कंपनीचे एक हेलिकॉप्टर छत्रपती संभाजीनगरमधून नागपूरच्या दिशेने जात होते. या हेलिकॉप्टरमधून एका पायलटसह 2 कर्मचारी प्रवास करत होते. अचानक हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने जालन्याच्या तपोवन तांडा भागात त्याचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.

हेलिकॉप्टरमधील सर्वजण सुखरुप आहेत. अचानक माळरानावर हेलिकॉप्टर उतरल्याने स्थानिकांसह लहान मुलांनी त्याठिकाणी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Jalana News: नागपूरकडे निघालेल्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग! गावकरी, पोलीस घटनास्थळी दाखल; जालन्यात काय घडलं?
PM मोदींच्या सभेने काही फरक पडणार नाही, कोल्हापुरकरांचा निर्णय पक्का; मालोजीराजे छत्रपतींना विश्वास, Video

नागपूर विमानतळ घडवण्याची धमकी..

नागपूर एअरपोर्ट बॉम्बने उडविण्याची धमकीचा मेल आल्याने खळबळ उडाली आहे. देश भारत आज अनके विमानतळावर धमकीचा मेल आले आहेत. धमकी मिळाल्यानंतर तपासणी केली जात असून यात काही मिळून आल्यास रियल ड्रिल असेल. सध्या ड्रिलच्या माध्यमातून तपासणी केली जात आहे.

Jalana News: नागपूरकडे निघालेल्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग! गावकरी, पोलीस घटनास्थळी दाखल; जालन्यात काय घडलं?
Shirur Loksabha Election: अमोल कोल्हे-आढळराव पाटील दोघेही एकमेकांच्या पडले पाया, पाहा व्हिडीओ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com