cbd belapur police arrests two Saam Digital
क्राईम

Navi Mumbai Crime: सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून 80 लाखांची फसवणूक, दाेघांना अटक

cbd belapur police arrests two : सिबिडी बेलापूर पोलिसांनी तांत्रिक तपास करत संशयित आरोपीला अटक केली आहे. त्याने अजून कोणाची अशा प्रकारे फसवणूक केली आहे का याचा अधिक तपास सुरु असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

Siddharth Latkar

- सिद्धेश म्हात्रे

सीबीआय विभागात पूर्वी तात्पुरत्या स्वरूपात चालक म्हणून कार्यरत असलेल्या एका ठगाने कोल्हापूर मधील आजरा गावात असणाऱ्या वन विभागाच्या पाचशे एकर जमिनीचे खोटे कागदपत्र तयार करून दोघांकडून तब्बल 80 लाखांची रक्कम घेऊन त्यांना फसवल्याची घटना नवी मुंबईत घडली आहे.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार सुनील धुमाळ याने आपण सीबीआय मध्ये अधिकारी असल्याचे खोटे सांगून प्रसाद घोरपडे आणि त्यांचा सहकारी जैन यांना विश्वासात घेऊन कोल्हापूर मधील आजरा गावात असणारी वनविभागाची जामीन तुमच्या नावे करुन देतो असे सांगत दोघांची फसवणूक केली.

यासाठी धुमाळ याने वन विभागाचा बनावट ना हरकत प्रमाणपत्र आणि दिंडोशी न्यायालयाची जमिनीसंदर्भात बनावट प्रत दाखवून तब्बल 80 लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सुनील धुमाळ विरोधात सीबीडी बेलापुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली.

Edited By : Siddhrth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: भारतात सूर्य सर्वात आधी मावळतो कोणत्या गावात मावळतो?

Maharashtra Live News Update: सुर्यवंशी मृत्यू प्रकरण; सोमनाथच्या मृत्यूशी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Prajakta Mali: प्राजक्ता जणू सौंदर्याची खाण...

Parbhani : आदर्श शेतवाटणी! दोन प्राध्यापक भावांनी शेतकरी भावाला दिला अधिक हिस्सा; मुलांचे शिक्षण व लग्नाचीही घेतली जबाबदारी

Crime News: मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्याने पित्याला अमानुष मारहाण; पाहा, VIDEO

SCROLL FOR NEXT