Police personnel investigate the crime scene after two property dealers were shot dead during a land dispute meeting in Rohtas, Bihar. Saam Tv
क्राईम

जमिनीच्या वादातून रक्तरंजित थरार! बैठक सुरू असतानाच दोन प्रॉपर्टी डीलरची गोळ्या झाडून हत्या

Land Dispute Double Murder In Rohtas Bihar: बिहारच्या रोहतास जिल्ह्यात जमीन वादातून भीषण हत्याकांड घडले. बैठकीदरम्यान दोन प्रॉपर्टी डीलरवर गोळीबार करून निर्घृण हत्या करण्यात आली.

Omkar Sonawane

बिहार राज्यातील रोहतास जिल्ह्यात रविवारी सायंकाळी जमीनीच्या वादातून दोन जणांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना सासाराम मुफस्सिल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डुमरिया गावात घडली असून सध्या परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे. मृतांची ओळख पटली असून तिलौथू जिल्ह्यातील उचैला गावातील 45 वर्षीय रुपेश सिंह आणि तिलौथू येथीलच विनय प्रजापती राहत होते.

बैठकीदरम्यान वाद विकोपाला

मिळालेल्या माहितीनुसार, डुमरिया गावात जमीन वादाच्या मुद्द्यावर दोन गटांमध्ये बैठक सुरू होती. यावेळी दोन्ही बाजूंमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला. वाद इतका वाढला की एका गटाने दुसऱ्या गटातील दोन जणांवर गोळीबार केला. या गोळीबारात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृतांच्या शरीरावर अनुक्रमे पाच आणि सात गोळ्यांच्या जखमा आढळून आल्या आहेत.

प्राप्त माहितीनुसार, दोन्ही मृतक प्रॉपर्टी डीलर होते. मृतांच्या नातेवाइकांनी सांगितले की, डुमरिया गावातील पप्पू सिंह याने एका जमिनीच्या व्यवहाराच्या संदर्भात फोन करून दोघांना गावात बोलावले होते. त्यानंतर त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मात्र, कोणताही जुना वाद असल्याचे नातेवाइकांनी नाकारले आहे.

घटनास्थळी एसपींची भेट

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रोहतासचे पोलीस अधीक्षक रौशन कुमार तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या सोबत सासाराम मुफस्सिल पोलीस ठाण्यासह आसपासच्या अनेक पोलीस ठाण्यांचे अधिकारी आणि मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एफएसएल पथकाला घटनास्थळी बोलावण्यात आले असून, दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी सासाराम सदर रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

पप्पू सिंहची गुन्हेगारी पार्श्वभूमी

या प्रकरणात एसपी रौशन कुमार यांनी सांगितले की, डुमरिया गावातील पप्पू सिंह या व्यक्तीवर दोन प्रॉपर्टी डीलरांच्या हत्येचा संशय आहे. पप्पू सिंहचा गुन्हेगारी इतिहास असून, दोन्ही मृतदेह ज्या वाहनातून ते गावात आले होते, त्याच वाहनात आढळून आले आहेत. पोलिसांकडून सर्व बाजूंनी सखोल तपास सुरू असून आरोपीच्या अटकेसाठी छापेमारी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Evening Snack Recipe : संध्याकाळी नाश्त्याला बनवा चटपटीत 5 पदार्थ

Maharashtra Live News Update: एक केस झाली म्हणून गप्प बसणारा नाही; मंत्री भरत गोगावले यांचा पुत्र विकास गोगावले यांच मोठ विधान

Long Mangalsutra Design: लग्नसराई किंवा फंक्शनसाठी ट्राय करा 'हे' ट्रेडिंग सुंदर मोठे मंगळसूत्र

Kolkata Nazirabad Fire: नझीराबादेतील एका गोदामाला भीषण आग; बंद गोडाऊनमध्ये अडकले मजूर, ७ जणांचा मृत्यू

Anjali Arora Boyfriend: एक गंभीर आरोप आणि अटक; 'कच्चा बदाम' फेम अंजली अरोराच्या बॉयफ्रेंड पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT