उत्तरप्रदेशच्या रामपूर जिल्ह्यामध्ये एक आश्चर्यचकित घटना घडली आहे. ज्यामुळे गावामध्ये एकच खळबळ उडाली आहे. अजीमनगर येथील कुम्हरिया गावामध्ये नवदाम्पत्याचे लग्न होऊन काही तासांतच नवरीने एका मुलीला जन्म दिला आहे. सुहागरातच्या आधीच नवरीने एका मुलीला जन्म दिला आणि त्या मुलीच्या रडायच्या आवाजाने संपूर्ण गाव थक्क झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, कुम्हरिया गावातील तरुण रिजवान याचे बहादुरगंज गावातील एका तरुणीशी लग्न ठरले होते. दोघांमध्ये आधीपासूनच प्रेमसंबंध होते आणि दोन्ही कुटुंबांमध्ये याबाबत चर्चा सुरू होती. काही दिवसांपूर्वी ही तरुणी अजीमनगर पोलीस ठाणे हद्दीतील मुरसैना चौकीत पोहोचली होती आणि लग्न लावून देण्याची मागणी केली होती. त्यानंतर पोलिस आणि सरपंचामध्ये सर्वांच्या उपस्थितीत दोन्ही कुटुंबांमध्ये चर्चा झाली आणि दोघांच लग्न ठरलं
शनिवारी संध्याकाळी हा नवरदेव काही लोकांसोबत गावी पोहोचला त्याने पारंपरिक पद्धतीने लग्न करून नवीन नवरीला घरी आणले. रात्री 12 वाजेच्या सुमारास नवरीच्या पोटात अचानक दुखू लागले. यामुळे घरातील सर्वच सदस्य घाबरून गेले. घरच्या लोकांनी फॅमिली डॉक्टरला बोलावले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले. पण काही तासातच घरामध्ये लहान मुलीचा रडायचा आवाज यायला लागला आणि काही वेळातच समजले की नवीन नवरीने एका गोंडस मुलीला जन्म दिला.
ही घटना वेगाने गावात पसरली आणि गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली. नवरदेवाने मुलीला कड्यावर घेत सर्व गावामध्ये पेढे वाटले यावेळी त्याचा आनंद गगनात मावेनासे झाला होता. हळूहळू ही बातमी आजूबाजच्या गावामध्ये पसरू लागली आणि चर्चेचा विषय ठरली. पोलिसांनी सांगितले की या सर्व प्रकरणाची आम्हाला कल्पना होती. या दोघांचे आधीपासूनच प्रेम संबंध होते आणि ती गर्भवती होती. दोघांनी सोबत राहायचा निर्णय घेतला असून यामध्ये कोणतोही कायदेशीर प्रक्रिया होणार नाहीये.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.