बाबासाहेब आंबेडकरांचं नाव अनावधनाने राहून गेलं; वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्याच्या संतापानंतर मंत्री गिरीश महाजनांची दिलगीरी

girish mahajan on Republic Day Controversy: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव अनावधनाने राहून गेल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी दिलगीरी देखील व्यक्त केली.
girish mahajan news
girish mahajan Saam tv
Published On
Summary

नाशिकमधील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात गोंधळ झाल्याचे दिसून आलं

भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख राहून गेल्याने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी गोंधल घातला

गिरीश महाजन यांच्याकडून दिलगीरी व्यक्त

अभिजीन सोनवणे, साम टीव्ही

प्रजाकसत्ताक दिनाच्या नाशिकमधील कार्यक्रमात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणात भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख राहून गेला. या कार्यक्रमादरम्याान वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्याने संताप व्यक्त केला. नोकरी गेली तरी चालेल. पण बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही, असं म्हणत वनविभागाच्या कर्मचारी माधवी जाधव यांनी संताप व्यक्त केला. या प्रकारानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी दिलगीरी व्यक्त केली. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव अनावधनाने राहून गेलं, असं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं.

नाशिकमधील प्रजाकसत्ताक दिनाच्या कार्यक्रमात काहीसा गोंधळ पाहायला मिळाला. मंत्री गिरीश महाजन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने वन विभागाच्या कर्मचाऱ्याच्या संतापानंतर परिसरात तणावजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून आलं. या संपूर्ण प्रकारानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

girish mahajan news
काळ आला होता, पण मदतीला देवमाणूस धावला; RPF जवानाने वाचवला प्रवाशाचा जीव, थरार कॅमेऱ्यात कैद

मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं की, भाषणात अनावधानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव राहून गेलं. माझा हेतू काही नव्हता. मुद्दाम नाव डावललं नाही. मागील भाषण बघा कधीही असे नाही. अनावधानाने झालं असेल, दिलगिरी व्यक्त करतो'.

आदिवासी समाजाच्या मोर्चावर गिरीश महाजन काय म्हणाले?

आदिवासी समाजाच्या मोर्चावर भाष्य करताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले, 'जे पी गावीत यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा आहे. मागेही मीच सामोरे गेलो होतो. काही प्रश्न असे आहे की अंमलबजावणी होत नाही. मोर्चा पुढे नेऊ नका असे म्हटले. प्रश्न सुटले पाहिजे असे त्यांचे म्हणणे. काही प्रश्न लगेच सुटण्याचं आहे. वनविभागा, महसूल, जलसंपदा, शिक्षण आणि आदिवासी खात्याशी संबंधित आहे. कॅबिनेट झाल्यावर उद्या बैठक आहे. मुख्यमंत्री मुंबईत आहेत. ते पण असू शकतात'.

girish mahajan news
धक्कादायक! रील्सस्टारवर गुंगीचं औषध देऊन अत्याचार; गोवा, केरळच्या हॉटेलमधील प्रायव्हेट व्हिडिओ रेकॉर्ड केला अन्

' गेल्या वेळी मी सामोरे गेलो. मार्ग काढला होता, अंमलबजावणी होत नाही. अधिकाऱ्यांना आणि मंत्र्यांना घेऊन मार्ग निघेल. मुंबईत येण्याची वेळ येणार नाही. आदेश दिलेत, पण अंमलबजावणी होत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. बैठकीत तोडगा निघेल, फार मोठे प्रश्न नाही. उकल झाली आहे, मार्ग निघेल, असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com