

रील्स व पॉडकास्टच्या नावाखाली तरुणीची फसवणूक
गुंगीकारक पदार्थ देऊन अश्लील व्हिडीओ चित्रीकरणाचा गंभीर आरोप
अत्याचाराच्या घटनेने खळबळ
संजय गडदे, साम टीव्ही
सोशल मीडियावर रिल्स आणि कलाकार म्हणून काम करणाऱ्या एका तरुणीची पॉडकास्ट आणि शूटिंगच्या नावाखाली फसवणूक केली. त्यानंतर अश्लील व्हिडीओ चित्रीकरण करून ते इंटरनेटवर प्रसारित केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. पीडित तरुणीने कांदिवली परिसरातील एका महिलेविरोधात आणि तिच्या सहकाऱ्यांविरोधात गंभीर आरोप केला. या प्रकरणी मुंबईच्या समता नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पिढीतेच्या तक्रारीवरून समता नगर पोलिसांनी एकूण आठ जणांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘सलमान’ नावाच्या व्यक्तीने जुलै 2025 मध्ये पॉडकास्टमध्ये कामाची संधी असल्याचे सांगत संपर्क साधला. त्यानंतर पीडित तरुणी ही ‘सोनिया गुप्ता’ नावाच्या महिलेच्या संपर्कात आली. कांदिवली पूर्व येथील तिच्या घरी शूटिंग होत होते. त्या ठिकाणी जेवणानंतर तिला वारंवार झोप येणे आणि अंगदुखी जाणवत असल्याचे तिने तक्रारीत नमूद केलंय.
सोनियाने शूटिंगसाठी गोवा आणि केरळला ऑगस्ट 2025 महिन्यात नेले. गोव्यातील एका रिसॉर्टमध्ये शूटिंगदरम्यान संशयास्पद प्रकार दिसल्यानंतरही तिला दिशाभूल करण्यात आली. काही दिवसांनंतर तिला मोबदला देण्यात आला आणि ती मुंबईत परतली. जानेवारी 2026 मध्ये तिच्या नातेवाईकाने इंटरनेटवरील काही वेबसाईट्सवर तिच्यासारखी दिसणारी तरुणी असलेले अश्लील व्हिडीओ पाहिल्याचे सांगितल्यानंतर प्रकार उघडकीस आला. तपासात हे व्हिडीओ गोव्यातील त्याच हॉटेलमधील असल्याचे लक्षात आल्याचा दावा पीडितेने केला आहे.
पीडित तरुणीचा आरोप आहे की, तिला गुंगीकारक पदार्थ देऊन तिच्या संमतीशिवाय गैरप्रकार करण्यात आलाय. त्याचे चित्रीकरण करून ते विविध अश्लील वेबसाईट्सवर अपलोड करण्यात आले. व्हिडीओ हटवण्याची मागणी केल्यानंतर तिला जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. संपूर्ण प्रकार हा पीडित तरुणीने सामाजिक कार्यकर्ते बिनु वर्गीस यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर तरुणीला हिम्मत देऊन या प्रकरणी समता नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात मदत मिळाली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.