Dharashiv : हृदयद्रावक! ग्रुप फोटो काढायला उभे राहिले, चक्कर येऊन खाली कोसळले; पोलीस अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू | पाहा VIDEO

Dharashiv Police Officer Mohan Jadhav Passes Away : प्रजासत्ताक दिनाच्या कर्तव्यावर असताना धाराशिव येथे पोलीस अधिकारी मोहन जाधव यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला.
Dharashiv : हृदयद्रावक! ग्रुप फोटो काढायला उभे राहिले, चक्कर येऊन खाली कोसळले; पोलीस अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू | पाहा VIDEO
Dharashiv Police Officer Mohan Jadhav Passes AwaySaam Tv
Published On
Summary
  • प्रजासत्ताक दिनी ऑन ड्युटी असताना पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू

  • सेल्फी काढताना चक्कर येऊन कोसळल्याची घटना

  • रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले

  • पोलीस दल व कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली

संपूर्ण भारतभर आज ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा होत आहे. ठिकठिकाणी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांची फौज तैनात करण्यात आली आहे. आज सकाळपासूनच पोलीस ऑन ड्युटी असून डोळ्यात तेल घालून पहारा देत आहेत. अशातच मनाला चटका लावून जाणारी घटना धाराशिव मधून समोर आली आहे. ऑन ड्युटी कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा सेल्फी काढत असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असून पोलीस वर्गातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिवच्या उमरगा येथील तलमोड चेकपोस्ट येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी कार्यक्रमासाठी कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस तैनात करण्यात आले होते. या दरम्यान उपस्थित राहीलेले दारूबंदी अधिकारी मोहन जाधव हे फोटो काढत असतानाच त्यांना चक्कर आली आणि ते जागीच धाडकन कोसळले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी शोक व्यक्त केला आहे.

Dharashiv : हृदयद्रावक! ग्रुप फोटो काढायला उभे राहिले, चक्कर येऊन खाली कोसळले; पोलीस अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू | पाहा VIDEO
WEH-BKC Bridge Update : वेस्टर्न एक्सप्रेस हायवे ते बीकेसी प्रवास होणार सुसाट, नवा पूल लवकरच होणार सुरू; कोणाला होणार जास्त फायदा? वाचा

त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. शवविच्छेदन अहवालात पोलीस अधिकारी मोहन जाधव यांचे निधन हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाले असल्याचे समोर आले आहे.

या अचानक झालेल्या घटनेमुळे प्रशासनात तसेच सहकारी वर्गात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.कर्तव्यदक्ष,शिस्तप्रिय अधिकारी म्हणून मोहन जाधव यांची ओळख होती. दरम्यान त्यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबियांवर देखील शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com