Lonavala Crime Saam Tv
क्राईम

Crime: भयंकर! बलात्कारप्रकरणी १४ वर्षे तरूंगावासाची शिक्षा, बाहेर आल्यानंतर दत्तक घेतलेल्या मुलीवर केला रेप

Bihar Crime: बिहारमध्ये भयंकर घटना घडली. बलात्कार प्रकरणी १४ वर्षे तुरूंगवासाची शिक्षा भोगून बाहेर आलेल्या व्यक्तीने आपल्याच १५ वर्षांच्या दत्तक घेतलेल्या मुलीवर दीड वर्षे बलात्कार केला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

Priya More

बिहारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बलात्कार प्रकरणी १४ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा भोगून बाहेर आलेल्या व्यक्तीने आपल्याच मुलीवर बलात्कार केला. या घटनेप्रकरणी आरोपीला नेपाळ बॉर्डरवरू पोलिसांनी अटक केली. आरोपी बिहारमध्ये राहणार आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २००७ मध्ये आरोपीने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली होती. या प्रकरणातील आरोपी मोहम्मद अर्शदला कोर्टाने १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात होती. आरोपी १४ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा भोगून बाहेर आला. तरी देखील त्याच्यामध्ये काहीच सुधारणा झाली नाही. तुरूंगातून बाहेर आल्यानंतर त्याने अनेक वेळा आपल्या १५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. आरोपीने या मुलीला दत्तक घेतले होते. तिच्यासोबतच त्याने भयंकर कृत्य केले.

पोलिसांनी सांगितले की, २०२४ मध्ये आरोपी मोहम्मद अर्शद तुरुंगातून सुटला. त्यानंतर त्याने १५ वर्षांच्या मुलीला दत्तक घेतले आणि तिची काळजी घेण्याचे आश्वासन दिले. पण त्याने दीड वर्षे या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. आरोपीने पीडित मुलीला धमकावले होते की, जर कुणाला सांगितले तर तुला जीवे मारून टाकेल. तो स्वतः तिला शाळेत सोडत असे आणि तिला घेऊन जात असे. घाबरलेल्या पीडितेने तिच्या आईला ही धक्कादायक माहिती सांगितली.

पीडितेच्या आईने २५ जून २०२५ रोजी शिवर पोलिस ठाण्यात धाव घेत आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. हे प्रकरण पोलिस ठाण्यात गेल्याचे लक्षात येताच आरोपी फरार झाला. आरोपीचा शोध घेत असताना त्याला त्यांनी बिहारमधील पूर्णिया येथून अटक केली. नेपाळ सीमेवरून त्याला अटक करण्यात आली. आरोपीला पुन्हा तुरूंगात पाठवण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: गुहागरच्या बुधल बीचवर चिपळूणच्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT