Love Crime : प्रेमाला नकार, दहावीच्या विद्यार्थ्याने शिक्षिकेला पेट्रोल टाकून पेटवलं

Latest Crime News Update : एका दहावीच्या विद्यार्थ्याने आपल्या महिला शिक्षिकेला पेट्रोल टाकून पेटवले. विद्यार्थ्याने प्रपोज केला, पण शिक्षिकेने नकार देत तक्रार केली. त्यामुळे विद्यार्थ्याचा राग अनावर झाला.
student sets teacher on fire after Love rejection
Narsinghpur: Police arrest Class 10 student who set female teacher ablaze after rejection.Meta AI Image
Published On
Summary
  • दहावीच्या विद्यार्थ्याने शिक्षिकेवर पेट्रोल टाकून पेटवले.

  • प्रेमाला नकार मिळाल्यामुळे विद्यार्थ्याने संतापातून भयंकर कृत्य केले.

  • शिक्षिका 20% भाजली असून उपचार सुरू आहेत.

  • आरोपीला पोलिसांनी अटक केली असून तपास सुरू आहे.

student sets teacher on fire after Love rejection : दहावीत शिकणारा विद्यार्थी २६ वर्षांच्या शिक्षिकेच्या प्रेमात पडला. पण हे प्रेम एकतर्फी होतं. प्रेमात वेडा झालेला विद्यार्थी आपल्या भावनांवर कंट्रोल करू शकला नाही, त्याने शिक्षिकेसोबत भयंकर कृत्य केले. दहावीच्या मुलाने महिला टीचरला पेट्रोल टाकून पेटवलं. ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशमधील नरसिंहपूरमध्ये घडली. या घटनेनंतर नरसिंहपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

मध्य प्रदेशमधील नरसिंहपूरमध्ये दहावीत शिकणाऱ्या मुलाने एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेला पेट्रोल टाकून पेटवल्याची घटना घडली. मुलाने शिक्षिकेला आपल्या मानातील प्रेमाच्या भावना सांगितल्या. त्यावेळी महिला टीचरने मुलाला स्पष्ट नकार दिला अन् याबाबतची तक्रार मुख्याध्यापकाकडे केली. आधीच प्रेमाचा नकार मिळाला, त्यात महिला टीचरने तक्रार केल्यामुळे मुलाचा राग अनावर झाला. त्यामधूनच त्याने महिला टीचरच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले.

student sets teacher on fire after Love rejection
Rekha Gupta : भाजपच्या मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारणारा आरोपी कोण? गुजरातसोबत आहे कनेक्शन

पेट्रोल टाकली अन् आग लावली -

नरसिंहपूरमध्ये सोमवारी ही धक्कादायक घटना घडली. मुलाने खटखट दरवाजा वाजवला. शिक्षिकेने दरवाजा उघडताच मुलाने हातातील पेट्रोल अंगावर टाकले अन् पेटवून दिले. त्यानंतर एकच खळबळ उडाली. आजूबाजूचे लोक धावत आले अन् महिला टीचरला तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले. टीचर या दुर्घटनेत २० टक्के भाजली गेली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महिला शिक्षिकेने पेट्रोल टाकणाऱ्या मुलाची ओळख पटवली आहे.

student sets teacher on fire after Love rejection
Pune-Solapur : पुणे - सोलापूर महामार्गावर विचित्र अपघात, कारने २ अलिशान गाड्यांना उडवले, दोघांचा जागीच मृत्यू

ज्या मुलाने महिला टीचरला पेटवलं तो तिचा माजी विद्यार्थी होता. येथील उत्कृष्ट विद्यालयात गेस्ट लेक्चरर म्हणून काम करत होती. याच काळात सूर्यांश कोचर नावाच्या विद्यार्थ्यासोबत ओळख झाली. 15 ऑगस्ट रोजी सूर्यांशने छेडछाड केली आणि आक्षेपार्ह टिप्पण्या केल्या. याबाबत त्यांनी शाळेचे प्राचार्य जी.एस. पटेल यांच्याकडे तक्रार केली होती. त्यामुळे मुलगा संतापला होता, त्याने सोमवारी महिला टीचरला पेटवलं. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे.

student sets teacher on fire after Love rejection
नग्न पूजेचा व्हिडिओ दाखवला, महिलेसोबत केलं अश्लील कृत्य, नागपुरात 'मामा'चा कारनामा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com