Pune-Solapur : पुणे - सोलापूर महामार्गावर विचित्र अपघात, कारने २ अलिशान गाड्यांना उडवले, दोघांचा जागीच मृत्यू

Pune-Solapur Highway Accident : पुणे-सोलापूर महामार्गावर यवतजवळ अपघात झाला. दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. कारवरील नियंत्रण सुटल्याने ती दुभाजक ओलांडून समोरून येणाऱ्या दोन गाड्यांना धडकली.
Pune Solapur Highway accident
Pune Solapur Highway accident today news in MarathiSaam TV Marathi News
Published On
Summary
  • पुणे-सोलापूर महामार्गावर यवतजवळ भीषण अपघात झाला.

  • कारने दुभाजक ओलांडून दोन आलिशान गाड्यांना जोरदार धडक दिली.

  • या अपघातात अशोक थोरबोले आणि गणेश दोरगे यांचा जागीच मृत्यू झाला.

  • पाच जण जखमी असून यवत पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

सागर आव्हाड, पुणे प्रितिनिधी

Pune Solapur Highway accident today news in Marathi : पुणे - सोलापूर महामार्गावर यवतजवळ अतिशय भयंकर अपघात झाला आहे. यवतमध्ये एका कारने दुभाजक ओलांडून दुसऱ्या बाजूच्या दोन आलिशान गाड्यांना जोरात धडक दिली. या विचित्र अन् भयंकर अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 5 जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर पुणे-सोलापूर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. यवत पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावर धाव घेतली अन् वाहतूक सुरळीत केली. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला केली. त्यानंतर मृतदेह पोस्टमार्टमासाठी पाठवले. या अपघातातील मयतमध्ये उरुळी कांचन व यवत येथील दोघांचा समावेश आहे. तर जखमींची नावे अद्याप समजू शकली नाहीत.

उरळी कांचनमधील अशोक विश्वनाथराव थोरबोले आणि यवतमधील गणेश धनंजय दोरगे यांचा या अपघातात जागेवरच मृत्यू झाला. अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत ज्ञानेश्वर विश्वनाथ थोरबोले यांनी यवत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राकेश मारूती भोसले (रा. बोरीभडक ता. दौंड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून याप्रकऱणाचा तपास करण्यात येत आहे.

Pune Solapur Highway accident
नग्न पूजेचा व्हिडिओ दाखवला, महिलेसोबत केलं अश्लील कृत्य, नागपुरात 'मामा'चा कारनामा

यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ज्ञानेश्वर थोरबोले हे त्यांच्या जवळ असलेल्या चारचाकी गाडीतून सोलापूरच्या दिशेने निघाले होते. यावेळी पुणे - सोलापूर महामार्गावरून राकेश भोसले हा सोलापूरच्या बाजूकडून पुण्याकडे निघाला होता. यावेळी त्याचे त्यांच्या लाल रंगाच्या गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी थेट दुभाजक ओलांडून समोरून येणाऱ्या दोन चारचाकी गाड्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात अशोक थोरबोले व गणेश दोरगे यांना जोरदार मार लागला होता. त्यांना तात्काळ नागरिकांच्या मदतीने यवत व उरुळी कांचन येथील रुग्णालयात दाखल केले असता दोघांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.

Pune Solapur Highway accident
देवेंद्र फडणवीस यांची भेट का घेतली, राज ठाकरेंनी A टू Z सगळं सांगितलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com