नग्न पूजेचा व्हिडिओ दाखवला, महिलेसोबत केलं अश्लील कृत्य, नागपुरात 'मामा'चा कारनामा

Nagpur fake godman nude ritual crime news : हबीबुल्ला मलिक उर्फ मामा या भोंदूबाबावर नागपुरातील पाचपावली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मामाने महिलेला नग्न पूजेचा व्हिडिओ दाखवला आणि काळी जादू करतो असे सांगून तिच्यासोबत अश्लील कृत्य केले.
Nagpur Crime News
Nagpur Police arrest fraud godman 'Mama' accused of showing nude ritual video and exploiting a woman.Saam TV Marathi news
Published On
Summary
  • नागपुरात भोंदूबाबावर नग्न पूजा दाखवून अश्लील कृत्याचा गुन्हा दाखल.

  • आरोपीचं नाव हबीबुल्ला मलिक उर्फ मामा, तो पश्चिम बंगालचा रहिवासी.

  • २० वर्षांपासून नागपुरात राहणाऱ्या मामाने गरीब व कष्टकरी लोकांना टार्गेट केले.

  • महिलेच्या धैर्यामुळे पोलिसांत तक्रार दाखल, आरोपीला अटक.

पराग ढोबळे, नागपूर प्रतिनिधी

Nagpur Crime News : नागपुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नग्न पूजेचा व्हिडिओ दाखवत महिलेसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या भोंदूबाबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हबीबुल्ला मलिक उर्फ मामा असे आरोपी भोंदूबाबाचे नाव आहे. तो मूळचा पश्चिम बंगाल येथील आहे. कुटुंबावरील संकट दूर करण्यासाठी महिलेसोबत ओळख वाढवून घरात प्रवेश मिळवला. आणि मी काळी जादू जाणतो म्हणून महिलेला नग्न पूजा करत व्हिडिओ पाठविला.

मिळालेल्या माहितीनुसार, नग्न पूजेचा व्हिडिओ दाखवत महिलेसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या भोंदूबाबावर नागपुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मूळचा पश्चिम बंगालमधील असून त्याचे नाव हबीबुल्ला मलिक उर्फ मामा आहे. मागील वीस वर्षापासून मामा नागपुरात स्थायिक आहे. त्या मामावर नागपूरच्या पाचपावली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून भोंदू बाबाचा शोध घेतला जात आहे.

हबीबुल्ला मलिक उर्फ मामा याने त्या महिलेला कुटुंबावरील संकट दूर करतो, म्हणत ओळख वाढवली. त्याने घरात प्रवेश मिळवला. घरामध्ये गेल्यानंतर मामाने मी काळी जादू जाणतो म्हणत महिलेला नग्न पूजा करत व्हिडिओ पाठवला. हा भोंदूबाबा गेल्या अनेक दिवसांपासून सदर महिलेसोबत अश्लील कृत्य करत होता असेही समोर आले आहे. त्याने त्या महिलेला कुटुंबीयाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही उघड झाले आहे.

Nagpur Crime News
ठाकरे ब्रँडचा २१-० ने पराभव, देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....

महिलेने हिंमत दाखवत भोंदू बाबाची पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर गुन्हा दाखल करत भोंदूबाबाला अटक करण्यात आली आहे. सदरील भोंदूबाबा त्याच्या भागात मामा म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच्या टार्गेटवर कष्टकरी आणि गरीब लोक असायचे. तो नेहमी साधारण चहा टपरीवर थांबायचा आणि तेथे लोक घरातील समस्या बोलत असताना. मी काळी जादू करतो म्हणून त्यांना हेरायचा अन् डाव साधायचा, असे तपासात समोर आले आहे.

Nagpur Crime News
Manoj Jarange : कुणबी प्रमाणपत्र समितीची बैठक, मनोज जरांगेंना निमंत्रण, तोडगा निघणार का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com