ठाकरे ब्रँडचा २१-० ने पराभव, देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....

BEST employee co-op bank election : शशांक राव यांच्या पॅनेलला १४ जागा, प्रसाद लाड यांना ७ जागा मिळाल्या. ठाकरे ब्रँडला एकही जागा मिळाली नाही. फडणवीस म्हणाले, “पतपेढी निवडणुकीत राजकारण करू नये, पण ठाकरे यांनी राजकारण केलं आणि मतदारांनी त्यांना नाकारलं.”
CM Deevndra fadanvis
CM Deevndra fadanvis Saam TV News Marathi
Published On
Summary
  • बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे ब्रँडचा २१-० असा पराभव झाला.

  • शशांक राव पॅनेलला १४ तर प्रसाद लाड यांना ७ जागा मिळाल्या.

  • देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया देत सांगितले की, “मतदारांनी ठाकरे ब्रँड नाकारला.”

  • बीएमसी निवडणुकीआधी हा पराभव ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जातो.

Devendra Fadnavis first reaction on Thackeray defeat : मुंबई महापालिकेची लिटमस टेस्ट मानल्या जाणाऱ्या बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे ब्रँड फेल ठरलाय. ९ वर्षांपासून सत्तेत असताना आणि दोन्ही ठाकरे एकत्र आल्यानंतरही बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही. प्रसाद लाड यांचे ७ तर शशांक राव यांच्या पॅनेलचे सर्वाधिक १४ जागांवर विजय मिळवला. मुंबईमध्ये 'ठाकरे ब्रँड'चा २१-० असा धुव्वा उडाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. बेस्ट कर्मचारी पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे ब्रँडचा वापर करण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण त्याला मुंबईकरांनी नाकारले, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते बुधवारी पत्रकारांशी बोलत होते. शशांक राव आणि प्रसाद लाड देखील आमचेच आहेत, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. (Uddhav and Raj Thackeray alliance rejected by Mumbai voters )

मुख्यमंत्री म्हणाले की,  ही एका पतपेढीची सहकारी संस्थेची निवडणूक होती, त्यात काही मोठं नाही. यामध्ये राजकारण करू नये असे माझं मत होतं. पण त्यांनी (ठाकरे) त्याचे राजकारण करण्यास सुरुवात केली. ठाकरे पुन्हा एकत्र येत आहेत आणि ठाकरे ब्रँड जिंकेल, असे त्यांनी सांगितले. पण त्यांच्या राजकारणाला जनतेनं उत्तर दिलंय. पतपेढीसारख्या साध्या निवडणुकीतही लोकांनी ठाकरेंना नाकारलं आहे. मतदारांनी ठाकरे ब्रँड नाकारला.

CM Deevndra fadanvis
शरद पवारांना मोठा हादरा, कोकणातील शिलेदार भाजपमध्ये, १६०० कार्यकर्त्यांनीही घेतले कमळ

बीएमसी निवडणुकीच्या आधी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. त्यांनी बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे ब्रँड उतरला, पण त्यांना दारूण पराभव स्विकारावा लागला. ९ वर्षांपासून सत्ता असतानाही ठाकरेंना मोठा हादरा बसलाय. २१ सदस्यांच्या निवडणुकीत ठाकरेंना एकही जागा मिळाली नाही. भाजप नेते आशिष शेलार यांनाही यावरून निशाणा साधलाय. ते म्हणाले की, आम्ही, भाजप म्हणून, ते लढवले नाही. शिवसेना (यूबीटी) आणि मनसेने हा राजकीय मुद्दा बनवला. पण त्यांना खातेही उघडता आले नाही. मुंबईकर कोणाला पाठिंबा देत आहेत हे दाखवणारे हे निकाल आहेत. बीएमसी निवडणुकीदरम्यान, आम्ही राव आणि लाड यांना आमचे स्टार प्रचारक बनवण्याचा विचार करत आहोत.

CM Deevndra fadanvis
Rekha Gupta : भाजपच्या मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारणारा आरोपी कोण? गुजरातसोबत आहे कनेक्शन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com