Rekha Gupta : भाजपच्या मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारणारा आरोपी कोण? गुजरातसोबत आहे कनेक्शन

Who slapped Delhi CM Rekha Gupta during Janata Darbar? : रेखा गुप्ता यांच्यावर दिल्लीतील जनता दरबार कार्यक्रमात हा हल्ला झाला. आरोपीचे नाव राजेश भाई खिमजी भाई सकारिया असून तो गुजरातच्या राजकोटचा रहिवासी आहे. त्याच्या कुटुंबातील एक सदस्य तुरूंगात असून त्याला सोडवण्याची मागणी घेऊन तो आला होता.
Who slapped Delhi CM Rekha Gupta during Janata Darbar?
Who slapped Delhi CM Rekha Gupta during Janata Darbar?
Published On
Summary
  • दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर जनता दरबारात हल्ला झाला.

  • आरोपी राजेश भाई सकारिया हा गुजरातच्या राजकोटचा रहिवासी आहे.

  • त्याने मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली चपराक मारली व अश्लील भाषा वापरली.

  • पोलिसांनी आरोपीला अटक केली असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

Why did Rajesh Bhai attack BJP CM Rekha Gupta? : राजधानी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर जनता दरबारमध्ये हल्ला करण्यात आला. भरकार्यक्रमात सर्वांसमोर तरूणाने मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली चपराक मारली. या घटनेनंतर दिल्लीमध्ये एकच खळबळ उडाली. मुख्यमंत्री सध्या दिल्लीमधील रूग्णालयात उपचार घेत असल्याचे समजतेय. पण भाजप मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या कानाखाली मारणारा ३५ वर्षांचा आरोपी नेमका कोण आहे? त्याचे गुजरात कनेक्शनही समोर आले आहे. त्याने हे धक्कादायक कृत्य का केले? याचीच चर्चा देशभरात सुरू आहे. (Gujarat connection in Rekha Gupta assault case)

राजधानी दिल्लीमध्ये नेमकं काय झालं?

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता या प्रत्येक बुधवारी जनता दरबार घेतात. या कार्यक्रमात त्या जनतेच्या अडीअडचणी समजून घेऊन सोडवण्याचे आश्वासन देतात. आजही रेखा गुप्ता यांनी सकाळी जनता दरबारमध्ये उपस्थित होत्या. मुख्यमंत्र्यांना अडचण सांगण्यासाठी ३५ वर्षाचा राजेश भाई खिमजी भाई सकारिया पोहचला. त्यानंतरच गोंधळ उडाला. राजेश याने मुख्यमंत्र्यांच्या हातात काही कागदपत्रे दिली अन् काहीतरी बोलला. त्यानंतर रेखा गुप्ता यांच्या कानाखाली मारली. पोलिसांनी त्या आरोपीला तात्काळ अटक केली आहे.  राजेश भाई खिमजी भाई सकारिया हा मूळचा गुजरातचा असल्याचे समजतेय.

Who slapped Delhi CM Rekha Gupta during Janata Darbar?
BJP CM : भाजपच्या मुख्यमंत्र्यांवर दिल्लीमध्ये हल्ला, जनता दरबारात कानाखाली मारली

राजेश हा मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर ओरडला आणि अश्लील, घाणेरड्या भाषेचा वापर केल्याचा आरोप आहे. दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी याबाबत खंडण केले. दिल्ली पोलिसांनी राजेश याला ताब्यात घेतले असून चौकशी करण्यात येत आहे. दिल्ली भाजपकडून मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला आहे.

Who slapped Delhi CM Rekha Gupta during Janata Darbar?
Crime : रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलीवर सामूहिक बलात्कार, दारू प्यायले अन्...

मुख्यमंत्र्यांवर हल्ला करणारा नेमका कोण?

मिडिया रिपोर्ट्सनुसार, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला करणारा राजेशभाई हा गुजरातमधील राजकोट येथील राहणारा आहे. आरोपी राजेश याच्या कुटुंबातील एकजण तुरूंगात आहे. त्याला सोडवण्याची मागणी राजेशने केली होती. त्याबाबतची याचिका घेऊन तो दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांकडे पोहचला होता. त्यावेळी कार्यक्रमात गोंधळ घातला अन् मुख्यमंत्र्यांवर हल्लाही केला. राजेश याला घटनास्थळावर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी करण्यात येत आहे. दिल्ली पोलिसांनी गुजरात पोलिसांसोबत संपर्क साधला असून आरोपने दिलेल्या माहितीची पडताळणी केली जात आहे. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Who slapped Delhi CM Rekha Gupta during Janata Darbar?
ठाकरे ब्रँडला मुंबईत मोठा धक्का, भाजप अन् शशांकराव पॅनलचा 'बेस्ट' विजय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com