BEST Election: ठाकरे बंधूंच्या हाती भोपळा, BMC च्या लिटमस टेस्टमध्ये ठाकरे फेल

Uddhav Thackeray And Raj Thackeray: मुंबई महापालिकेची लिटमस टेस्ट मानल्या जाणाऱ्या बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे ब्रँड फेल ठरलाय. या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंना भोपळा मिळाला. तर शशांक राव यांच्या पॅनलला यश आले.
BEST Election: ठाकरे बंधूंच्या हाती भोपळा, BMC च्या लिटमस टेस्टमध्ये ठाकरे फेल
BEST ElectionSaam Tv
Published On

ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत मोठा झटका बसलाय...मात्र बेस्टच्या निवडणुकीत ठाकरेंचा पराभव का झाला? बेस्ट निवडणुकीतील पराभवाचा महापालिका निवडणुकीवर किती परिणाम होणार? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

वाजत गाजत एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंना पहिल्याच घासाला मीठाचा खडा लागलाय. मुंबई महापालिकेची लिटमस टेस्ट मानल्या जाणाऱ्या बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे ब्रँड फेल ठरलाय. ९ वर्षांपासून सत्तेत असताना आणि दोन्ही ठाकरे एकत्र आल्यानंतरही बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत मात्र त्यांना भोपळाही फोडता आला नाही.

राज्यभर प्रचंड चर्चा झालेल्या बेस्ट पतपेढी निवडणुकीत शशांक राव यांच्या पॅनलने २१ पैकी १४ जागा जिंकल्या. तर प्रसाद लाड यांच्या नेतृत्वात महायुतीच्या पॅनलने ७ जागा जिंकल्या. मात्र दोन्ही ठाकरे बंधूंची ताकद एकत्र येऊनही त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. कामगारांच्या हिताकडे दुर्लक्ष केल्यामुळेच ठाकरेंना भोपळा मिळाल्याचं मत शशांक राव यांनी व्यक्त केलंय.

BEST Election: ठाकरे बंधूंच्या हाती भोपळा, BMC च्या लिटमस टेस्टमध्ये ठाकरे फेल
Maharashtra Politics : रोहित पवारांची वृत्ती औरंगाजेबासारखी, मला अजित पवारांच्या मुलांची चिंता; गोपीचंद पडळकर असे का म्हणाले?

तर दुसरीकडे संजय राऊतांनी मात्र आपल्याला निकाल माहितीच नाही, अशी अजब प्रतिक्रिया दिलीय. बेस्ट पतपेढी निवडणुकीतील पराभवानंतर ठाकरेंवर टीका करण्यासाठी शिंदेंच्या हाती आयतंच कोलित मिळालंय. पतपेढीची ही निवडणूक ज्यांनी प्रतिष्ठेची केली होती आणि आपलीच सत्ता येणार अशी भीमगर्जनाही केली त्या भाजपलाही अवघ्या ७ जागांवर समाधान मानावं लागलंय. मात्र विजयापेक्षा ठाकरे पराभूत झाल्यानं भाजपनं आनंद व्यक्त केलाय.

BEST Election: ठाकरे बंधूंच्या हाती भोपळा, BMC च्या लिटमस टेस्टमध्ये ठाकरे फेल
Maharashtra Politics : कोण होणार नाशिकचा पालकमंत्री? भुसे, महाजन, भुजबळांमध्ये रस्सीखेच? वाचा स्पेशल रिपोर्ट

मनसेने मात्र बेस्ट पतपेढीतील दारुण पराभवानंतरही आपली हार मानलेली नाहीये. ठाकरे बंधूंची बेस्ट पतपेढीत निष्क्रियता दिसून आली. तसंच जुनी माणसं बदलून नवी माणसं आणण्यामुळेही कामगार नाराज होते.. त्यातच ऐन निवडणुकीत ठाकरेंच्या उमेदवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले.. तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांसाठी केलेल्या कामाचा शशांक राव यांना फायदा झाल्याची चर्चा रंगलीय.

BEST Election: ठाकरे बंधूंच्या हाती भोपळा, BMC च्या लिटमस टेस्टमध्ये ठाकरे फेल
Maharashtra Politics: शरद पवारांना आणखी एक धक्का, माजी आमदाराने सोडली साथ; अजित पवारांच्या पक्षात जाणार

खरंतर बेस्ट पतपेढी निवडणुकीत अवघ्या १५ हजार कामगारांनी मतदान केलं. मात्र त्यातही ठाकरे बंधूंची जादू चालली नाही. त्यामुळे १ कोटी मतदार असलेली मुंबई महापालिका जिंकण्यासाठी ठाकरेंना नवी रणनीती आखावी लागेल. नाही तर भाजपच्या आक्रमक रणनीतीपुढे ठाकरेंची २५ वर्षांची मुंबई महापालिकेवरील सत्ताही बेस्ट पतपेढीप्रमाणेच संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही.

BEST Election: ठाकरे बंधूंच्या हाती भोपळा, BMC च्या लिटमस टेस्टमध्ये ठाकरे फेल
Maharashtra Politics : ठाकरे गटाला कल्याणमध्ये खिंडार, नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा शिंदेसेनेत प्रवेश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com