Rakesh Khedkar And Gauri Khedkar Saam Tv
क्राईम

Bengaluru Crime: मराठी गाणं वाजवल्याने राकेशची सटकली, गौरीला जीवेच मारलं; चौकशीदरम्यान धक्कादायक खुलासा

Rakesh Khedkar And Gauri Khedkar: राकेश खेडेकरने पत्नीची हत्या का केली? त्या रात्री दोघांमध्ये कशावरून वाद झाला होता याची धक्कादायक माहिती त्याने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितली.

Priya More

बंगळुरूमध्ये कौटुंबिक वादातून राकेश खेडेकर या तरुणाने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केली होती. याप्रकरणात अटकेत असलेल्या राकेशने गौरीची हत्या कशी केली आणि का केली यामागचे कारण सांगितले आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान राकेशने पत्नीची हत्या करण्याची वेळ का आली यामागचे कारण सांगितले. एका खासगी कंपनीत नोकरी करणाऱ्या राकेश खेडेकर यांनी २६ मार्चच्या रात्री हुलीमावूजवळील दोड्डाकम्मनहल्ली येथील राहत्या घरी पत्नी गौरीची हत्या केली.

गौरीच्या हत्येनंतर राकेशने तिच्या भावाला फोन करून याबाबत माहिती दिली तेव्हा ही घटना उघडकीस आली. २ एप्रिल रोजी राकेशला पोलिस कोठडी सुनावण्यात आली. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, 'चौकशीदरम्यान राकेशने कबूल केले की गौरी नेहमीच त्याच्या आईवडिलांचा आणि धाकट्या बहिणीचा अपमान करत असल्याने तो नाराज होता.'

राकेशने पोलिसांना चौकशीदरम्यान सांगितले की, 'गौरी नेहमीच माझ्या वडिलांबद्दल, आईबद्दल आणि बहिणीबद्दल वाईट बोलायची. ती घरी आणि बाहेर नेहमीच त्यांचा अपमान करायची. तिने आपल्याला बंगळुरूला जाण्याचा, नवीन नोकरी शोधण्याचा आणि नवीन जीवन सुरू करण्याचा सल्ला दिला. शाळेच्या दिवसांपासून ती माझ्यावर वर्चस्व गाजवत होती. पण मी तिला खूप प्रेम करत होतो. गौरीला एक महिना झालं तरी बंगळुरूमध्ये नोकरी मिळाली नसल्याने तिला आपण मुंबईत परत जावे असे वाटत होते आणि अनेकदा यावर वाद व्हायचा.'

राकेशने त्याच्या कबुलीजबाबात सांगितले की, '२६ मार्च रोजी संध्याकाळी राकेश आणि गौरी घरी बराच वेळ एकटे होते. नंतर ते घराजवळ फिरायला गेले. घरी परतताना राकेशने दारू आणि नाश्ता विकत घेतला. ते घरी संध्याकाळी ७.३० च्या सुमारास घरी पोहचले. राकेश काम संपल्यानंतर जवळजवळ दररोज दारू पित असे. गौरीने नाश्ता वाढला आणि गाणी लावली. दोघेही सोबत खायला बसला. त्या रात्री दोघांनीही आळीपाळीने त्यांची आवडती गाणी वाजवण्याचे मान्य केले.'

'गौरी भात शिजवत असताना राकेश दारूचे ग्लास घेऊन बसला आणि गाणी वाजवू लागला. काही गाणी वाजवल्यानंतर जेव्हा गौरीची पाळी आली तेव्हा तिने एक मराठी गाणे वाजवले ज्यामध्ये वडील-मुलाच्या नात्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या गेल्या होत्या. तिने या गाण्यासोबत माझी थट्टा केली. त्यानंतर ती राकेशच्या चेहऱ्याजवळ गेली तिने गाल फुगवले आणि त्याच्या चेहऱ्यावर वारंवार तोंडाने हवा मारू लागली. राकेशने चिडून तिला ढकलले. ती स्वयंपाक घराजवळ जोरात पडली. ती रागावली आणि स्वयंपाकघरातून जाऊन तिने चाकू आणला आणि शिवीगाळ करत राकेशवर चाकू फेकला. रागाच्या भरात, राकेशने चाकू उचलला आणि रात्री ८.४५ ते ९ च्या दरम्यान तिच्या मानेवर दोनदा आणि पोटात एकदा वार केले. खूप रक्तस्त्राव झाला आणि तिचा मृत्यू झाला. तो मृत्यू झालेल्या गौरीच्या शेजारी बसला आणि तिला सांगितले की तुझ्या कृत्यांमुळे त्याला खू त्रास होतो.'

गौरीने कपडे पॅक करून मुंबईला परत जाण्यासाठी सुटकेस रिकामी केली होती. राकेशने दावा केला की, त्याने तिची नाडी तपासली आणि तिचा मृतदेह सुटकेसमध्ये भरला. ही सुटकेस स्वयंपाकघरातून बाथरूमपर्यंत ओढत असताना हँडल तुटला. रक्त काढून टाकण्यासाठी राकेशने बाथरूमच्या बाहेर सुटकेस ठेवली. त्याने घर स्वच्छ केले आणि जेव्हा मृतदेह नेण्याचा त्याने प्लान केला त्यात तो अयशस्वी झाला. त्यानंतर त्याने घराला कुलूप लावले आणि रात्री १२.४५ च्या सुमारास तेथून निघून गेला. तो महाराष्ट्रातील शिरवळ येथे पोहोचला जिथे त्याला अटक करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: चांदोली धरणातून‌ 4 हजार 500 क्युसेक विसर्ग

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Raj Thackeray Look: डोळ्याला गॉगल अन् गळ्यात मफलर; विजयी मेळाव्यातील राज ठाकरेंचा स्टायलिश लूक

Sushil Kedia: 'मला माफ करा, राज ठाकरेंचा आदर करतो'; मनसेच्या दणक्यानंतर उद्योजक सुशील केडिया वठणीवर

National Highway Toll : प्रवाशांनो लक्ष द्या! राष्ट्रीय महामार्गांवरील टोल दर ५० टक्क्यांनी कमी; जाणून घ्या सरकारची अधिसूचना

SCROLL FOR NEXT