Crime News : बायकोचा गळा दाबून जीव घेतला, त्यानंतर नवऱ्याने गळफास घेऊन आयुष्य संपवले, सोलापुरात खळबळ

karmala Crime News : सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्यात नवऱ्याने पत्नीचा गळा दाबून खून केल्यानंतर गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांकडून तपास सुरू असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
Crime
घरातून ५ लाख चोरले, घरमालकाला कळताच आला हृदयविकाराचा झटका; जागीच मृत्यूSaam tv
Published On

Solapur karmala Crime News : सोलापूरमधील करमाळ्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नवऱ्याने बायकोचा गळा दाबून खून केला. त्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापूरमधील करमाळ्यात घडली आहे. या घटनेनंतर करमाळ्यात एकच खळबळ उडाली आहे. गुरूवारी ही घटना उघडकीस आली आहे. नवऱ्याने टोकाचे पाऊल का उचलले? याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती पोलिसांना मिळालेली नाही. पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

Crime
Shirdi Crime : दरोडेखोर घरात घुसले, बाप-लेकाला निर्घृणपणे संपवलं; साईबाबांच्या शिर्डीत आक्रीत घडलं

गुरुवारी सायंकाळी पत-पत्नी यांचा मृतदेह आढळून आले. करमाळा पोलिसा याप्रकरणी सुरूवातीला आकस्मित मृत्यूची नोदं करण्यात आली होती. पण मृत मुलाच्या वडिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांकडून तपास वेगात सुरू कऱण्यात आला आहे. घातपात आहे की आत्महत्या याबाबत पोलीस तपास करत आहेत. युवराज लक्ष्मण शेरे (वय ३१), रूपाली युवराज शेरे (वय २५) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. करमाळ्यातील कोर्टी येथे शेरे वस्ती येथे हे दाम्पत्य राहत होते. करमाळा पोलिसांकडून या घटनेचा तपास करण्यात येत आहे. पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा तपास केला जात आहे.

Crime
Pune Crime : चार दिवसांपासून नवरा बेपत्ता, बायको अन् कुटुंब शोध घेऊन हैराण, पाचव्या दिवशी खाणीत मृतदेहाचे तुकडे; पुणे हादरलं

या घटनेमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पतीने असे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत पोलिसांना कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींच्या मते कौटुंबिक वाद असू शकतो, तर काहींना यामागे अन्य कारण असल्याचा संशय आहे. सध्या पोलिस सर्व बाजूंनी तपास करत असून, लवकरच याप्रकरणी अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. या घटनेने करमाळ्यात शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com