Shirdi Crime : दरोडेखोर घरात घुसले, बाप-लेकाला निर्घृणपणे संपवलं; साईबाबांच्या शिर्डीत आक्रीत घडलं

Shirdi Father and Son Murder : शिर्डी विमानतळाजवळील काकडी शिवारातील गुंजाळवस्ती येथे दोघांची निर्घुण हत्या तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. दरोड्याच्या उद्देशाने हल्ला करत हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
Shirdi Father and Son Murder
Shirdi Father and Son MurderSaam Tv News
Published On

अहिल्यानगर (शिर्डी) : शिर्डीत एकीकडे रामनवमीच्या उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून दुसरीकडे शिर्डीत दोघांची निर्घुण हत्या करण्यात आली आहे. तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. शिर्डी विमानतळाजवळील काकडी शिवारातील गुंजाळवस्तीवर ही घटना घडली आहे. दरोड्याच्या उद्देशाने हल्ला करत हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिर्डी विमानतळाजवळील काकडी शिवारातील गुंजाळवस्ती येथे दोघांची निर्घुण हत्या तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. दरोड्याच्या उद्देशाने हल्ला करत हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे.

Shirdi Father and Son Murder
Beed : गृहराज्यमंत्र्यांचा मोबाइल बीडमध्ये गायब, पोलिसांत तक्रार दाखल

मृतात वडील आणि मुलाचा समावेश आहे तर आई गंभीर जखमी झाली आहे. साहेबराव भोसले (वय ६०) आणि कृष्णा भोसले (वय ३०) अशी मृतांची नावे आहेत. तर घरातील सामानाची उलथापालथ झाल्याचं देखील समोर आलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र, दोघांच्या हत्येमुळे शिर्डीत एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन संशयितांना ताब्यात घेतलं आहे.

तोंड दाबून जमीनीवर आपटलं आणि...

कल्याणजवळील अटाळी परिसरात राहणाऱ्या ६० वर्षीय रंजना पाटेकर यांचे दागिने चोरून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली होती. अखेर खडकपाडा पोलिसांच्या चिकाटीच्या तपासामुळे या प्रकरणातील आरोपीचा छडा लागला. चांद उर्फ मोहम्मद शेख याला पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे.

Shirdi Father and Son Murder
CM Devendra Fadnavis : जिकडे चूक आहे, तिकडे चूक म्हणावं लागेल, पण...; पुणे गर्भवती महिला मृत्यू प्रकरणात CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com