Beed : गृहराज्यमंत्र्यांचा मोबाइल बीडमध्ये गायब, पोलिसांत तक्रार दाखल

Beed Crime News : मस्साजोग येथे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या सांत्वन पर भेटीसाठी आलेले गृहराज्यमंत्र्यांचा योगेश कदम यांचा मोबाईल चक्क माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर गायब झाला आहे.
Minister Yogesh Kadam
Minister Yogesh Kadamsaam tv
Published On

Beed Latest Crime News : बीड जिल्ह्यात एक चकीत करणारी घटना घडली आहे. गृहराज्यमंत्र्यांचा योगेश कदम यांचा मोबाईल कॅमेऱ्यासमोरच गायब झाला. योगेश कदम बीड दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांचा मोबाईल गायब झाला आहे. शुक्रवारी योगेश कदम यांनी मस्साजोग येथे संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची सांत्वनासाठी भेट घेतली. या भेटीत माध्यमांचे कॅमेरे उपस्थित असताना त्यांचा मोबाईल अचानक गायब झाला.

योगेश कदम यांचा मोबाईल गायब झाल्याचं समजताच सर्वांनाच धक्का बसला. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी याला दुजोरा दिला आहे. राज्याच्या गृहराज्यमंत्र्यांचा मोबाईलच सुरक्षित नसेल, तर सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेची हमी कशी मिळणार, असा सवा विरोधकांनी उपस्थित केला आहे.

Minister Yogesh Kadam
Beed Latest News: कृषिमंत्र्यांच्या बीडमध्ये शेतकऱ्यांचा पीक विमा लाटतंय कोण? चक्क नगरपालिकेच्या जागेवर 6 हजार हेक्टरचा पीक विमा

दौऱ्यावेळी कॅमेऱ्यासमोरच मोबाईल गायब झाला, त्यामुळे बीड प्रशासन आणि पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मोबाईल हरवला की चोरीला गेला, याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. ही घटना सोशल मीडियावरही चांगलीच चर्चेत आली आहे. या प्रकरणाचा लवकरच छडा लागावा, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात येत आहे. तर बीडमधील विरोधकांनी सरकारला सुरक्षेच्या मुद्द्यावरून धारेवर धरले आहे.

Minister Yogesh Kadam
Beed News: आधी बायकोनं जीव दिला, नंतर नवऱ्यानं झाडाला लटकून आयुष्य संपवलं; २ महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न
Minister Yogesh Kadam
Beed: पाठीवर निळे वळ, खोक्याचं डोकं बर्फाच्या पाण्यात बुडवलं..कोठडी नसतानाही मारहाण; वकिलांचा आरोप

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com