Crime News
Crime NewsSaam Tv

Crime News: आधी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार नंतर मैत्रिणीबरोबर जबरदस्ती, जंगलात एकट्या जात असतानाच..

Dehradun Police Crack Down: एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि तिच्या मैत्रिणीवर दोन नराधमांनी लैंगिक अत्याचार केला आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी २ आरोपींना अटक केली आहे.
Published on

देशात सध्या गुन्हेगारांच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. एक धक्कादायक घटना उत्तराखंडची राजधानी देहरादूनमधून समोर येत आहे. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि तिच्या मैत्रिणीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी २ नराधमांना ताब्यात घेतलं आहे. आधी मुली जंगलच्या दिशेने गेल्या. नंतर त्यांच्या मागून २ आरोपी गेले आणि त्यांनी मुलींसोबत दुष्कृत्य केलं. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

देहरादून पोलिसांनी पीटीआयला सांगितले की, १ एप्रिल रोजी एका महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती, की हसनपूर गावातील एका पुरूषाने तिच्या १५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला आहे आणि आरोपीच्या मित्राने तिच्या मैत्रिणीचा विनयभंग केला आहे.

 Crime News
Uday Samant: उदय सामंत पुन्हा राज ठाकरेंच्या भेटीला; "शिवतीर्थावर" नेमकी कोणती चर्चा रंगली?

अल्पवयीन मुलगी आणि तिची मैत्रीण जंगलच्या दिशेने जात होते. त्यानंतर दोन आरोपी त्या ठिकाणी पोहचले. जंगलात कुणी नसल्याचे फायदे घेत, एकाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि त्याच्या मित्राने पीडित मुलीच्या मैत्रिणीचा विनयभंग केला.

 Crime News
Beed Crime: ५३ वर्षीय नराधमानं शाळेच्या आवारात मुलीला छेडलं, संतप्त पालकांनी बदडलं

या प्रकरणाची माहिती पीडित मुलीच्या कुटुंबाला मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. कुटुंबाने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, आरोपींविरोधात गुन्हा दाखल पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. तसेच पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com