Crime: दिवसाढवळ्या भरचौकात राडा, रिक्षा चालकावर कोयत्याने सपासप वार; पोलिसांनी तरुणाचा माज उतरवला

Chhatrapati Sambhajinagar Police Crack Down: एका सराईत गुन्हेगारानं भरचोकात रिक्षा चालकावर कोयत्याने वार केले आहे. आरोपीला अटक करत भरचौकात त्याची धिंड काढली आहे.
Sambhajinagar
SambhajinagarSaam
Published On

राज्यात सध्या गुन्हेगारांच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. एक धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. एका सराईत गुन्हेगारानं भरचोकात रिक्षा चालकावर कोयत्याने वार केले आहे. कोयत्याने वार होत असतानाच रिक्षा चालकाने आपला जीव वाचवण्यासाठी तेथून पळ काढला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी आरोपीला बेड्या ठोकल्या असून, पोलिसांनी त्याची धिंड देखील काढली आहे.

आरोपी हा अट्टल गुन्हेगार असून, त्याच्या नावे बलात्कार, हत्या, लूटमारी यांसारखे तब्बल १५ गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपी आणि रिक्षा चालकाचा एका गोष्टीवरून वाद झाला. आरोपीने थेट भरचौकात कोयता काढून रिक्षा चालकावर हल्ला केला. घाबरून पळ काढल्याने रिक्षा चालकाचा जीव वाचला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

Sambhajinagar
CM Fellowship: कामाची बातमी! तरूणांना सरकारी विभागांत काम करण्याची संधी; मुख्यमंत्री फेलोशिप जाहीर; वयोमर्यादा अन् मानधन जाणून घ्या!

या प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेने १२ तासात आरोपी सय्यद फैजल (उर्फ तेजा) ला बेड्या ठोकल्या आहेत. एवढेच नाही तर गुन्हेगार तेजाला पोलिस आयुक्तालयात येथेच्छ पाहुणचार दिला.

Sambhajinagar
Crime: सिगारेटमुळे पेटला वाद! पान टपरीवाल्याने ग्राहकावर कैचीने वार केले, कपडे फाडले आणि..VIDEO

तेजाने दहशत माजवलेल्या चौकात त्यालाच खाली मान घालून लंगडत पायी धिंड काढून माज उतरवला. तेजाने काही वर्षांपासून शहरातल्या वेगवेगळ्या भागात दहशत पसरवली होती. एखाद्या गुन्हेगारीच्या घटनेनंतर तो जेलमध्ये जातो. जेलमधून सुटल्यानंतर तू पुन्हा वाजत गाजत मिरवणूक काढत शहरात येतो आणि पुन्हा दहशत पसरवतो. आता पोलिसांनी रस्त्यावरच त्याची धिंड काढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com