
महाराष्ट्रातील तरूणांसाठी एक आनंदाची बातमी. आता तरूणांना थेट प्रशासनासोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून "मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२५-२६" नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या फेलोशिपनुसार, ६० फेलोंची निवड करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
काय आहे मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम?
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाचा उद्देश राज्याच्या तरूणांना प्रशासकीय प्रक्रिया, धोरणं आणि निर्णय घेण्याच्या प्रक्रियेचा थेट अनुभव देणे हा आहे. यामुळे तरूणांमधील विचार करण्याची क्षमता, तंत्रज्ञानाची जाण आणि आवड प्रशासनासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास शासनाने व्यक्त केला आहे.
एकूण ६० फेलोंची निवड
या फेलोशिप अंतर्गत एकूण ६० फेलोंची निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या फेलोंना राज्यातील विविध प्रशासकीय कार्यलयांमध्ये काम करण्याची संधी दिली जाणार आहे.
अंमलबजावणी कोण करणार?
या फेलोशिपच्या निवडी संदर्भातील निकष, नियुक्ती संदर्भातील अटी आणि शर्ती तसेच शैक्षणिक संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक कार्यक्रमाची रूपरेषा, तसेच अंमलबजावणीबाबत शासन निर्णय, महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. या कार्यक्रमाची अंमलबजावणी नियोजन विभागाच्या अर्थ आणि सांख्यिकी संचालनालय यांच्यामार्फत केली जाईल.
निवडीचे निकष
अर्जदार हा भारताचा नागरिक असावा.
कोणत्याही शाखेतील पदवीधर, किमान ६० टक्के गुण आवश्यक.
किमान १ वर्षाचा पूर्णवेळ कामाचा अनुभव आवश्यक आहे.
तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून पूर्णवेळ इंटर्नशिप, अप्रेंटीसशिप, आर्टीकलशिपसह १ वर्षाचा अनुभव आवश्यक राहील.
यासह पूर्णवेळ स्वयंरोजगार, स्वयंउद्योजकतेचा अनुभवही ग्राह्य धरले जाईल. अर्जदाराला तसे स्वयंघोषणापत्र सादर करावे लागेल.
भाषा आणि संगणक ज्ञान, मराठी भाषा लिहिता, वाचता, आणि बोलायला येणं आवश्यक आहे. तसेच हिंदी आणि इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान असणेही आवश्यक आहे. यासह संगणक हाताळणी आणि इंटरनेटचे ज्ञान असणे आवश्यक.
मानधन आणि वयोमर्यादा
उमेदवाराचे वय अर्ज सादर करावयाच्या अंतिम तारखेला किमान २१ ते कमाल २६ वर्ष असावे. या अर्जाकरीत शुल्क ५०० रूपये आकारण्यात येणार आहे. फेलोशिप कार्यक्रमांतर्गत निवड झालेल्या फेलोंना दरमहा ५६, १०० मानधन दिले जाईल. तसेच प्रवासखर्च ५,४०० असे एकत्रित ६१, ५०० छात्रवृ्त्तीच्या स्वरूपात देण्यात येईल. या सर्व बाबी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.