Bengaluru Crime Saam Tv
क्राईम

Bengaluru Crime: अनैतिक संबंधांच्या संशयातून भयंकर कांड! मुलाच्या डोळ्यादेखत बायकोची हत्या; फरार पतीचा मृतदेह आढळला

Bengaluru Latest News: चिक्कबल्लापूर जिल्ह्यातील बागेपल्ली तालुक्यातील रहिवासी असलेल्या मीना आणि महेश यांचे २० वर्षांपूर्वी दुसरे लग्न झाले होते. यापूर्वी मीना पहिल्या पतीपासून विभक्त होऊन दोन मुलांसह शहरात आली होती.

Gangappa Pujari

बेंगळुरू, ता. १८ ऑगस्ट २०२४

अनैतिक संबंधांच्या संशयातून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना बेंगळुरूमध्ये घडली. पत्नीच्या हत्येनंतर दोन दिवसांनी पतीचाही झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर पतीनेही आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? वाचा सविस्तर...

विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना दौडकम्मनहळ्ळी येथे घडली. पत्नीची हत्या करून बेपत्ता झालेला ४६ वर्षीय पतीचाही मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हत्येनंतर पत्नीने गळफास घेत आयुष्य संपवल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. महेश कुमार (वय 40) असे हत्या करणाऱ्या पतीचे नाव असून मीना (वय 36) असे पत्नीचे नाव आहे.

चिक्कबल्लापूर जिल्ह्यातील बागेपल्ली तालुक्यातील रहिवासी असलेल्या मीना आणि महेश यांचे २० वर्षांपूर्वी दुसरे लग्न झाले होते. यापूर्वी मीना पहिल्या पतीपासून विभक्त होऊन दोन मुलांसह शहरात आली होती. अलिकडे महेशला पत्नीच्या वागण्यावर संशय येऊ लागला, यावरुनच त्यांच्यामध्ये वाद होत होते.

शुक्रवारी या दोघांमधील वाढ वाढत गेला ज्यानंतर महेशने मुलासमोरच मीनावर लोखंडी रॉडने वार करून तिची हत्या केली व तेथून पलायन केले. शुक्रवारी रात्री 7.30 च्या सुमारास मीना या व्यवसायाने घरकाम करणाऱ्या त्यांच्या हुलीमावू येथील घरात रक्ताच्या थारोळ्यात सापडल्या. या घटनेनंतर महेशचाही मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. यावरुनच त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat: भोंदू खरातचा पंचतारांकित 'अड्डा', मुंबईतल्या हॉटेलमधून चालवायचा हवाला रॅकेट

White House Firing: मोठी बातमी ! अमेरिकेच्या व्हाइट हाउसजवळ गोळीबार

Maharashtra Politics: शरद पवारांची दिल्लीवारी, उद्या होणार शपथविधी

India vs Pakistan: भारतावर हल्ला करणार, पाकिस्तानची पोकळ धमकी

Mumbai Local: हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत, सिवूड्स ते जुईनगरदरम्यान तांत्रिक बिघाड; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT