Shruti Vilas Kadam
मनुक्यांमध्ये नैसर्गिक साखर जास्त असते. त्यामुळे जास्त मनुके खाल्ल्यास रक्तातील साखर वाढू शकते. डायबिटीज असलेल्या लोकांनी मनुके कमी प्रमाणात खावेत.
मनुक्यांमध्ये साखर आणि कॅलरीज जास्त असतात. त्यामुळे जास्त मनुके खाल्ल्यास वजन वाढू शकते. वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी मनुके कमी प्रमाणात खावेत.
कमी रक्तदाबाचा त्रास असलेल्या लोकांनी मनुके खाताना काळजी घ्यावी. मनुके खाल्ल्याने रक्तदाब कमी होतो, असे ठोस पुरावे नाहीत. तरीही आहारात बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
काही लोकांना मनुके खाल्ल्याने ॲलर्जी होऊ शकते. मनुके खाल्ल्यानंतर खाज सुटणे, शरीरावर सूज येणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे दिसल्यास मनुके खाणे थांबवावे.
मनुके चिकट असल्यामुळे ते दातांना चिकटतात. त्यामुळे दातांमध्ये कीड होण्याची शक्यता असते. म्हणून मनुके खाल्ल्यानंतर तोंड स्वच्छ धुवावे आणि दातांची काळजी घ्यावी.
मनुक्यांमध्ये फायबर जास्त असते. त्यामुळे काही लोकांना मनुके खाल्ल्यानंतर गॅस होणे, पोट फुगणे किंवा पोट दुखणे असा त्रास होऊ शकतो. अशा लोकांनी मनुके कमी खावेत.
मनुक्यांमध्ये पोटॅशियम असते. किडनीचा त्रास असलेल्या लोकांना पोटॅशियम कमी खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे अशा व्यक्तींनी मनुके खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.