Manasvi Choudhary
हिंदू संस्कृतीत, कमळाला विशेष महत्व आहे. महिलांच्या साडी डिझाईन्समध्ये देखील कमल डिझाईन ट्रेंडमध्ये आहे.
पारंपारिक साड्यांपासून ते अगदी मॉडर्न डिझायनर ड्रेप्सपर्यंत कमळ डिझाईन सध्या प्रचंड ट्रेंडमध्ये आहे.
तुम्हालाही जर ट्रेडिशनल लूकसोबतच काहीतरी युनिक आणि क्लासी ट्राय करायचे असेल, तर कमळाच्या डिझाईन्सचे हे ५ लेटेस्ट पॅटर्न्स ट्राय करा.
आजकाल हलक्या वजनाच्या ऑर्गनझा साड्यांची खूप फॅशन आहे. या फॅब्रिकवर मोठ्या आकाराचे किंवा पेस्टल रंगांमधील कमळाचे प्रिंट्स खूपच आकर्षक दिसतात. ते तुम्ही निवडू शकता.
पैठणी किंवा कांजीवरम साड्यांमध्ये काठावर किंवा पदरावर कमळाची फुले वीणलेली असतात. सोन्याच्या किंवा चांदीच्या जरीच्या धाग्यांनी साकारलेली कमळाची नक्षी साडीला एक अतिशय रिच आणि राजेशाही लूक देते.
मलमल किंवा सिल्कच्या साड्यांवर हाताने रंगवलेली कमळाची फुले आणि पानांची डिझाईन सध्या महिलांना आवडत आहे. ते तुम्ही निवडू शकता.
हेवी सिल्क किंवा जॉर्जेट साड्यांवर जरदोज किंवा थ्रेड वर्कच्या मदतीने कमळाच्या फुलांची नक्षी उठवली जाते. लग्नसमारंभ किंवा मोठ्या सणासुदीसाठी अशा साड्या नेसल्यास अत्यंत सुंदर लूक दिसतो.
ज्या महिलांना खूप डिझाईन्स आवडत नाहीत, त्यांच्यासाठी साध्या बॉर्डरवर छोटी कमळाची बुटी किंवा डिझाईन असलेली साडी बेस्ट आहे.