न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या २ सामन्यांत पूर्णपणे बदलणार टीम इंडिया; नव्या कर्णधार-उपकर्णधारासह मैदानात उतरणार

Shreyas Iyer to captain India in final two ODIs : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांसाठी टीम इंडियात मोठे बदल होणार आहेत. शुभमन गिल आणि केएल राहुलसह पाच प्रमुख खेळाडू बाहेर राहणार आहेत.
Shreyas Iyer
team indiasaam tv
Published On: 

India vs New Zealand fourth and fifth ODI squad changes : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या वनडे मालिकेदरम्यान भारतीय संघात एक मोठा बदल पाहायला मिळणार आहे. मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांसाठी टीम इंडियाचे चित्र पूर्णपणे बदललेले असेल. त्यामध्ये कर्णधारापासून ते अनेक महत्त्वाच्या खेळाडूंमध्ये फेरबदल करण्यात आला आहे. तिसऱ्या वनडे सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण पावसामुळे सामना रद्द करण्यात आला.

श्रेयस अय्यर सांभाळणार धुरा

सध्या सुरू असलेल्या मालिकेतून कर्णधार शुभमन गिल आणि अनुभवी यष्टीरक्षक केएल राहुल हे शेवटच्या दोन सामन्यांतून बाहेर पडणार आहेत. हे दोन्ही खेळाडू आगामी कसोटी मालिकेच्या तयारीसाठी वेलिंग्टनला रवाना होणार आहेत. त्यामुळे शेवटच्या दोन सामन्यांत (चौथा आणि पाचवा वनडे) श्रेयस अय्यर भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे, तर ईशान किशन उपकर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे.

Shreyas Iyer
NCP Merger : पुन्हा भूकंप होणार? अजित पवार गटाच्या आमदारांनी मागितली शरद पवारांची वेळ, काहीतरी मोठं घडणार?

कोण कोणते खेळाडू होणार बाहेर?

शुभमन गिल आणि केएल राहुल यांच्याशिवाय गोलंदाजी युनिटमधील काही प्रमुख चेहरे अखेरच्या दोन सामन्यासाठी नसतील. त्यामध्ये कुलदीप यादव, अंशुल कंबोज आणि मोहम्मद सिराज यांचा समावेश असेल. या खेळाडूंना कसोटी मालिकेवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी आराम देण्यात आला. १९ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेच्या तयारीसाठी या सर्व खेळाडूंना शेवटच्या दोन वनडे सामन्यांना मुकावे लागत आहे.

Shreyas Iyer
मोठी बातमी! मुंबई ते पुणे प्रवास आता होणार सुपरफास्ट; उन्नत मार्गाचे ६७ टक्के पूर्ण; ९० मिनिटांचा वेळ वाचवणार

प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला मिळणार संधी?

नियमित खेळाडूंच्या अनुपस्थितीत आता ऋतुराज गायकवाड आणि ईशान किशन यांना अंतिम ११ जणांच्या संघात (Playing XI) संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. ईशान किशन रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करू शकतो, तर मधल्या फळीत ऋतुराज गायकवाड फलंदाजी करताना दिसू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.