मोठी बातमी! मुंबई ते पुणे प्रवास आता होणार सुपरफास्ट; उन्नत मार्गाचे ६७ टक्के पूर्ण; ९० मिनिटांचा वेळ वाचवणार

Mumbai Pune Expressway : मुंबई ते पुणे प्रवास आता अधिक वेगवान होण्याची शक्यता! अटल सेतू आणि मुंबई-पुणे एक्सप्रेसवे जोडणाऱ्या ७.३५ किमी उन्नत मार्गाचे ६७ टक्के काम पूर्ण झाले आहे. हा मार्ग सुरू झाल्यानंतर प्रवासाचा वेळ ६० ते ९० मिनिटांनी कमी होण्याची अपेक्षा आहे.
Mumbai-Pune Travel
Mumbai-Pune Travelsaam tv
Published On: 

Atal Setu Mumbai Pune Expressway connector project update : मुंबई आणि पुणे दरम्यानचा प्रवास अधिक जलद आणि सुखकर करण्यासाठी अटल सेतू आणि मुंबई-पुणे एक्सप्रेसवे जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. हा सुमारे ७.३५ किलोमीटरचा उन्नत मार्ग (Elevated Corridor) आता ६७ टक्के पूर्ण झाला आहे. या प्रोजेक्टमुळे प्रवाशांचा तब्बल ९० मिनिटांचा (दीड तास) वेळ वाचणार आहे. याद्वारे नवी मुंबई विमानतळ आणि बंदर कनेक्टिव्हिटी देखील अधिक मजबूत होणार आहे.

अटल सेतू-उन्नत मार्गाचे ६७% काम पूर्ण

मिळालेल्या माहितीनुसार, अटल सेतूला मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाशी जोडणाऱ्या प्रस्तावित उन्नत मार्गाचे ६७% प्रत्यक्ष काम पूर्ण झाले आहे. ७.३५ किलोमीटर लांबीच्या या मार्गामुळे दोन्ही मार्ग जोडले जातील. त्यामुळे मुंबई आणि पुणे दरम्यानचा प्रवास सुधारेल अशी अपेक्षा आहे.

७.३५ किमी लांबीचा कॉरिडॉर

हा प्रकल्प चिरले-पालास्पे मार्गावरून जाणार आहे. यामुळे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (अटल सेतू) आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग यांच्यात थेट दुवा निर्माण होईल. दोन प्रमुख वाहतूक मार्गांमधील वाहतूक सुधारण्यासाठी हा सहा पदरी उन्नत मार्ग म्हणून नियोजित आहे.

९० मिनिटांचा वेळ वाचणार

मुंबई आणि पुणे दरम्यानचा प्रवास अधिक जलद आणि सोपा करण्यासाठी सुरू असलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम आता वेगाने पुढे जात आहे. आतापर्यंत ६७ टक्के काम पूर्ण झाले आहे. लवकरच उन्नत मार्ग सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर दक्षिण मुंबई आणि पुणे यांमधील प्रवासाचा वेळ तब्बल ६० ते ९० मिनिटांनी (दीड तास) कमी होईल.

Mumbai-Pune Travel
NCP Merger : पुन्हा भूकंप होणार? अजित पवार गटाच्या आमदारांनी मागितली शरद पवारांची वेळ, काहीतरी मोठं घडणार?

पनवेल जाममधून सुटका:

या तिसऱ्या पातळीवरील (Third-level) उन्नत मार्गामुळे वाहनचालकांना गजबजलेला पनवेल मुख्य जंक्शन बाईपास करून थेट पुढे जाता येईल. यामुळे वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल. प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.

नव्या प्रकल्पामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि जेएनपीए (JNPA) बंदराकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी एक अतिरिक्त आणि वेगवान मार्ग उपलब्ध होईल. तसेच हा मार्ग एनएच-४८ (NH-48) आणि गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यांशी जोडला जाणार आहे.

Mumbai-Pune Travel
Gokul Election : सतेज पाटलांना मोठा धक्का! कोरमच्या खेळात महायुतीने बाजी मारली; 'हा' नेता बनला गोकुळचा नवा अध्यक्ष

मुंबई ५९ मिनिटांत

या कनेक्टरमुळे एनएच-४८ आणि एनएच-३४८ सोबतची महामार्ग जोडणी अधिक मजबूत होईल. तसेच गोव्याकडे जाण्याचा मार्ग सुधारेल अशी अपेक्षा आहे. द्रुतगती मार्ग, बोगदे, मेट्रो कॉरिडॉर आणि मोक्याच्या रस्त्यांना एका प्रादेशिक वाहतूक जाळ्यात एकत्रित करण्याच्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या 'मुंबई ५९ मिनिटांत' या व्यापक संकल्पनेचाही हा एक भाग आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.