Beed Crime Saam Tv
क्राईम

Beed Crime: बीडमध्ये मध्यरात्री हत्येचा थरार, मित्राने मित्राला जागीच संपवलं; धारधार शस्त्राने वार नंतर...

Beed Police: बीडमध्ये मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. मध्यरात्री हा हत्येचा थरार रंगला. धारधार शस्त्राने वार करत तरुणाला संपवण्यात आलं. या घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडाली.

Priya More

योगेश काशिद, बीड

बीडमध्ये मित्राने मित्राची हत्या केल्याची भयंकर घटना घडली. बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. तरुणाचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झाला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, बीड शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत तरुणाची धारधार शस्त्राने वार करत करण्यात आली. मंगळवारी मध्यरात्री ही धक्कादायक घटना घडली. किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर मित्रानेच मित्राची हत्या केली. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. सदरील घटनेनंतर जिल्हा रुग्णालय परिसरात नातेवाईक आणि मित्र परिवारांनी मोठी गर्दी केली आहे.

शिवाजीनगर पोलिसांनी सांगतले की, बीड शहरातील स्वराज्यनगर भागातील विजय सुनील काळे (वय २५ वर्षे) या तरुणाची हत्या करण्यात आली. या तरुणाच्या छातीवर तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करण्यात आले. गंभीर जखमी अवस्थेत विजय काळेला बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. पण उपचारापूर्वीच दाखल डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

ही घटना शिवाजीनगर पोलिस ठाणे हद्दीत घडली असून गल्लीतीलच मित्रांसोबत काही कारणावरून विजय काळेचा वाद झाला होता. वादानंतर त्याची हत्या करण्यात आल्याचा हा प्रकार घडल्याची माहिती प्रथमदर्शनी दिली आहे. या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Blood Pressure : हाय BP च्या रुग्णांसाठी 'हा' ज्यूस ठरतो वरदान, आताच डाएटमध्ये करा समावेश

Maharashtra News Live Update: सुनेत्रा पवारांसाठी सुप्रिया सुळे मैदानात; बारामतीमधील सभेला जाणार

Weight Loss Diet: डाएटमध्ये भाकरीसोबत खा ही एक भाजी, फॅट होईल ७ दिवसातच कमी

Maharashtra Government: राज्य सरकारचा मोठा निर्णय! सरकारी कर्मचाऱ्यांसाठीचा २२ वर्षांपूर्वीचा नियम बदलला

Sambhajinagar: ट्रॅफिक पोलिसाला भरचौकात मारहाण, आधी शिवीगाळ नंतर कॉलर पकडून कानशिलात लगावली; VIDEO समोर

SCROLL FOR NEXT