
Crime News : एका ३५ वर्षीय महिलेला तिच्या लिव्ह-इन पार्टनरने जाळल्याची घटना समोर आली आहे. आरोपी हा कॅब ड्रायव्हर असून त्याला दारुचे व्यसन होते. महिला आणि आरोपी मागील काही वर्षांपूर्वी एकत्र लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. पेट्रोल टाकून आरोपीने महिलेला जाळण्याचा प्रयत्न केला. उपचारादरम्यान रुग्णालयात महिलेचा मृत्यू झाला. ही घटना बंगळुरूमध्ये घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विठ्ठलने पीडित महिला वनजाक्षी हीच्यासोबत बऱ्याच कालावधीपासून लिव्ह-इनमध्ये राहत होता. त्याचे तीन वेळा लग्न झाले होते. वनजाक्षीनेही जवळपास चार वर्षांपूर्वी विठ्ठलसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये येण्यापूर्वी दोनदा लग्न केले होते. एकत्र राहत असताना विठ्ठल वनजाक्षीचा छळ करत होता.
दारुच्या व्यसनापायी विठ्ठल वनजाक्षीला त्रास देत असे. मारहाणीला, हिंसाचाराला कंटाळून वनजाक्षी विठ्ठलपासून दूर राहू लागली होती. तिने दुसऱ्या पुरुषाशीही मैत्री केली होती. त्या दोघांना विठ्ठलने पाहिले होते. वनजाक्षी तिच्या नव्या प्रियकरासह कारमधून फिरत असताना विठ्ठलने त्यांच्या कारचा पाठलाग केला. त्याने गाडीत पेट्रोल ओतले. त्याने वनजाक्षी, तिचा प्रियकर आणि ड्रायव्हर यांच्यावर पेट्रोल टाकले.
वनजाक्षीचा प्रियकर आणि कारचा ड्रायव्हर हे दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले, तर विठ्ठलने वनजाक्षीचा पाठलाग केला, तिच्यावर अधिक पेट्रोल ओतले आणि लाईटरने तिला पेटवून दिले. रस्त्यावरुन जाणाऱ्या एका व्यक्तीने तिला मदत करण्याचा प्रयत्न केला. आसपासच्या लोकांसह वनजाक्षीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विठ्ठलला अटक केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.