Pune : पोलिसांवर चाकूने हल्ला, कुख्यात गुंडाचा एन्काउंटर; पुण्यात नेमकं काय घडलं?

Police Encounter : पुण्यातील शिक्रापूर येथे एका गुंडाचा एन्काउंटर करण्यात आला. चोरी, दरोडे प्रकरणात आरोपी लखन भोसले हा पोलिसांच्या चकमकीत मारला गेला.
Pune Police Encounter
Pune Police Encountersaam tv
Published On
Summary
  • पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथे पोलिस आणि गुंडांमध्ये चकमक झाली असून कुख्यात लखन भोसले ठार झाला.

  • चोरी आणि दरोड्याच्या गुन्ह्यांमध्ये वॉंटेड असलेला भोसले पोलिसांवर हल्ला करताना गोळीत जखमी झाला.

  • रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असून इतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

Pune Police Encounter : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथे पोलीस आणि गुडांमध्ये घुमश्चक्री झाली. सातारा पोलीस आणि ३ आरोपी गुंड समोरासमोर आले. गुंडांकडून पोलिसांवर हल्ला करण्यात आला. त्याला पोलिसांनी प्रत्युत्तर दिले. या चकमकीत लखन भोसले या गुंडाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मारल्या गेलेल्या लखन भोसलेवर सातारा जिल्हासह सांगली जिल्ह्यात जबरी चोरीसह दरोड्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत. दोन दिवसापूर्वी महिलेच्या गळ्यातील चेन स्नॅचिंग करून फरार झालेल्या या आरोपीला शोधण्यासाठी सातारा पोलिसांचे पथक शिक्रापूर येथे गेले असताना सदर घटना घडली. लखन भोसले हा खटाव तालुक्यातील जयराम स्वामी वडगाव येथील रहिवासी आहे.

Pune Police Encounter
Walmik Karad : वाल्मीक कराडला मोठा धक्का! बीड कारागृहातला मुक्काम वाढला, कारण...

सोनसाखळी चोरीतील आरोपीला पकडण्यासाठी सातारा पोलिसांचे एक पथक आज (३० ऑगस्ट) पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर परिसरात आले होते. तीन आरोपी पोलिसांच्या रडारवर होते. आरोपींना पकडण्यासाठी गेले असताना लखन जाधव याने पोलीस कर्मचाऱ्यांवर चाकूने हल्ला केला. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी प्रत्युत्तर दिले.

Pune Police Encounter
Terrorist Encounter : जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराला मोठं यश, चकमकीत दहशतवादी बागू खान उर्फ ​​ह्यूमन जीपीएस ठार

लखन जाधवने चाकू हल्ला केल्यानंतर सातारा पोलिसांनी स्वसंरक्षणात बंदुकीतून गोळी झाडली. गोळी लखन भोसलेच्या कमरेत लागली. यामध्ये तो गंभीररित्या जखमी झाला. त्याला पोलिसांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरु झाले. उपचारादरम्यान लखन भोसलेचा मृत्यू झाला. पोलिसांच्या चकमकीदरम्यान इतर आरोपी पसार झाले.

Pune Police Encounter
Kalyan : सोशल मीडियावर मैत्री, खासगी व्हिडीओवरुन ब्लॅकमेलिंग; बॉयफ्रेंडच्या जाचाला कंटाळून तरुणीनं आयुष्य संपवलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com