Walmik Karad : वाल्मीक कराडला मोठा धक्का! बीड कारागृहातला मुक्काम वाढला, कारण...

Walmik Karad Beed : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराडने न्यायालयात जामीन अर्ज केला होता. हा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. हा कराडला मोठा धक्का मानला जात आहे.
Walmik Karad
Walmik Karadx
Published On
Summary
  • संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराडचा जामीन अर्ज बीड विशेष मकोका न्यायालयाने फेटाळला.

  • याआधीही कराडचा दोषमुक्ती अर्ज फेटाळण्यात आला होता, त्यामुळे त्याला सलग मोठे धक्के बसले आहेत.

  • न्यायालयाच्या या निर्णयामुळे वाल्मीक कराडचा बीड कारागृहातील मुक्काम आणखी वाढणार आहे.

योगेश काशिद, साम टीव्ही, प्रतिनिधी

Walmik Karad News : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराडला न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. वाल्मीक कराडने कारागृहातून बाहेर पडण्यासाठी जामीन अर्ज केला होता. हा अर्ज बीडच्या विशेष मकोका न्यायालयाने फेटाळला असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामधील मुख्य सूत्रधार असलेल्या वाल्मीक करडाचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. याआधी न्यायालयाने कराडचा दोष मुक्तीचा अर्ज फेटाळला होता. आता त्याचा जामीन अर्ज देखील बीडच्या न्यायालयाने फेटाळला आहे. यामुळे कराडला सलग धक्के बसल्याचे म्हटले जात आहे.

Walmik Karad
Devendra Fadnavis : जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवणारे 'ते' कोण? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं; VIDEO

वाल्मीक कराडहा संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी वाल्मीक कराडवर मकोका लावण्यात आला होता. कारागृहामधून बाहेर पडण्यासाठी त्याने वकिलांकडून जामीन अर्ज केला होता. या अर्जावर दोन्ही वकिलांचा युक्तिवाद झाला होता. पण याबाबतचा निर्णय न्यायालयाकडून राखून ठेवण्यात आला होता.

Walmik Karad
Dowry : आणखी एक वैष्णवी! बीडमध्ये दहा लाखांसाठी सासरच्यांनी विवाहितेला संपवलं, आई-वडील धाय मोकलून रडले

आज (३० ऑगस्ट) बीडच्या विशेष मकोका न्यायालयाने वाल्मीक कराडच्या जामीन अर्जासंदर्भात निर्णय जाहीर केला. कराडचा जामीन अर्ज बीड विशेष न्यायालयाने फेटाळला. न्यायालयाचा हा निर्णय कराडसाठी मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे वाल्मीक कराडचा बीड जिल्हा कारागृहातील मुक्काम वाढला आहे.

Walmik Karad
Viral Video : अभिनेत्याचं स्टेजवर अभिनेत्रीशी गैरवर्तन, थेट कमरेत घातला हात; सोशल मीडियावर होतंय ट्रोलिंग

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com