Beed : सरकारी वकिलानं कोर्टातच आयुष्य संपवलं, आता आला मोठा ट्विस्ट; न्यायाधीशावर गुन्हा दाखल

Beed Shocking : बीडच्या वडवणी न्यायालयात एका सरकारी वकीलाने आत्महत्या केली होती. या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी त्याच न्यायालयाती न्यायाधीशाला अटक केली आहे.
beed court
beed courtsaam tv
Published On
Summary
  • बीडच्या वडवणी न्यायालयात सरकारी वकील विनायक चंदेल यांनी आत्महत्या केली.

  • आत्महत्येच्या सुसाईट नोट आणि मुलाच्या फिर्यादीनंतर न्यायाधीश रफीक शेख आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

  • ही घटना न्यायालयीन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी असून कुटुंबीय न्याय मागत आहेत.

योगेश काशिद, साम टीव्ही, प्रतिनिधी

Beed Crime : बीडच्या वडवणी न्यायालयात दोन दिवसांपूर्वी धक्कादायक घटना घडली होती. सरकारी वकील विनायक चंदेल यांनी वडवणी न्यायालयात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या आत्महत्या प्रकरणात मोठी ट्वीस्ट समरो आली आहे. चंदेल यांच्या सुसाईट नोट आणि त्यांच्या मुलाने दिलेल्या माहितीनंतर एका न्यायाधीशाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारी वकील विनायक चंदेल यांचा मुलगा विश्वजीत चंदेल यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीच्या आधारे आणि चंदेल यांच्या सुसाईट नोटच्या आधारे न्यायालयाचे न्यायाधीश रफीक शेख आणि एका कर्मचाऱ्यावर वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायाधीशावर गुन्हा दाखल होण्याची ही कदाचित पहिलीच घटना आहे. यामुळे संपूर्ण न्यायालयीन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चंदेल कुटुंब न्याय मिळवण्याची सातत्याने मागणी करत आहे.

beed court
Auto News : वाहनचालकांना दिलासा! २० वर्षे जुनी गाडी चालवता येणार, सरकारचा मोठा निर्णय

बुधवारी (२० ऑगस्ट) बीडमधील वडवणी येथील स्थानिक न्यायालयात सरकारी वकील विनायक चंदेल यांनी खिडकीला दोरी बांधून आत्महत्या केली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. पोलिसांनी धाव घेत विनायक चंदेल यांचा मृतदेह ताब्यात घेतला होता. न्यायालयात आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली होती.

beed court
बैलपोळ्याच्या आनंदावर विरजण! शाळेला सुट्टी असल्याने गावी आला, नाल्यात बुडून ६ वर्षीय मुलाचा मृत्यू

विनायक चंदेल यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यांनी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी आम्हाला दाखवली नाही. त्या चिठ्ठीमध्ये काय लिहिले आहे. त्याबाबत आमच्याकडे काही माहिती नाही. पण जे कुणीही या प्रकरणात दोषी असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विनायक चंदेल यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.

beed court
Cricket : अल्पवयीन मुलीवर अत्याचार! कोर्टाने याचिका फेटाळली, प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या अडचणी वाढल्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com