Cricket : अल्पवयीन मुलीवर अत्याचार! कोर्टाने याचिका फेटाळली, प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या अडचणी वाढल्या

Yash Dayal : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा वेगवान गोलंदाज यश दयालच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने त्याची याचिका फेटाळली आहे.
yash dayal
yash dayalx
Published On
Summary
  • अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या प्रकरणात क्रिकेटपटू यश दयालची याचिका जयपूर उच्च न्यायालयाने फेटाळली.

  • न्यायालयाने अटक आणि पोलिस कारवाई थांबवण्यास नकार दिल्याने यश दयालच्या अडचणी वाढल्या आहेत.

  • पीडितेने न्यायालयात यश दयालच्या युक्तिवादाला विरोध केला असून अंतिम सुनावणी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे.

Cricket News : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोक्सो कायद्याअंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यात क्रिकेटपटू यश दयालच्या अडचणी वाढल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणी राजस्थानमधील जयपूर न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने यश दयालला कोणताही दिलासा देण्यास नकार दिला आहे. सुनावणीत पीडितेचे वकील उपस्थित होते. उच्च न्यायालयाने यश दयालची अटक आणि पोलीस कारवाई थांबवलेली नाही.

जयपूर उच्च न्यायालयाकडून दिलासा न मिळाल्याने यश दयाल यांच्या अडचणी वाढणार आहेत. न्यायालयात सुनावणीदरम्यान यश दयालने पुन्हा एकदा मला एका कटात अडकवण्याचा प्रयत्न केले जात आहे, असा युक्तिवाद केला होता. या प्रकरणाची अंतिम सुनावणी उच्च न्यायालयात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होईल असे म्हटले जात आहे.

yash dayal
Auto News : वाहनचालकांना दिलासा! २० वर्षे जुनी गाडी चालवता येणार, सरकारचा मोठा निर्णय

या प्रकरणाच्या मागील सुनावणीदरम्यान राजस्थान उच्च न्यायालयाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा वेगवान गोलंदाज यश दयालची अटक थांबवण्यास नकार दिला होता. पीडिता अल्पवयीन आहे. त्यामुळे अटक आणि पोलीस कारवाई थांबवता येणार नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते. या प्रकरणात न्यायालयाने केस डायरी मागवली होती.

yash dayal
तो आला अन् माझ्या स्तनांना स्पर्श केला, प्रसिद्ध अभिनेत्रीनं सांगितला तिच्यासोबत घडलेला भयंकर अनुभव

२३ जुलै रोजी जयपूरमधील सांगानेर पोलीस स्टेशनमध्ये एका तरुणीने यश दयालच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. माझी २०२३ मध्ये यश दयालशी भेट झाली. तेव्हा मी १७ वर्षांची होते. क्रिकेटमध्ये करिअर घडवण्याचे आश्वासन देत यशने माझे भावनिक आणि शारीरिक शोषण केल्याचा आरोप पीडितेने केला. या प्रकरणात यश दयालने अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने १५ जुलै रोजी त्याच्या अटकेवर बंदी घातली होती.

yash dayal
Actor Death News : लोकप्रिय अभिनेत्याचे निधन, मनोरंजनसृष्टीवर शोककळा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com