Crime News: संतापजनक! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; दारू प्यायल्यानंतर नराधमांनी प्रायव्हेट पार्टमध्ये...

Minor Girl Physcial Abused In Rajasthan: राजस्थानमधील बांसवाडा जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडलीय. अज्ञात लोकांनी १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला. अत्याचारानंतर पीडितेला रस्त्यावरून फेकून दिल्याची घटना घडलीय.
crime news
Minor Girl Physcial Abused In Rajasthansaamtv
Published On
Summary
  • राजस्थानच्या बांसवाडा येथील घाटोल पोलीस स्टेशन परिसरात संतापजनक घटना घडलीय.

  • अल्पवयीन मुलीवर दोन जणांनी सामूहिक अत्याचार केला.

  • पीडिता बेशुद्ध अवस्थेत असताना तिला रस्त्यावर फेकून दिलं.

तळपायाची आग मस्तकात नेणारी घटना घडलीय. काही अज्ञात लोकांनी १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला. अत्याचारानंतर मुलीला बेशुद्ध अवस्थेत सोडून तेथून पळ काढला. नराधमांनी आधी अल्पवयीन मुलीला मारहाण केली नंतर तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. इतकेच नाहीतर नराधमांनी तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये दारूची बाटली घातली आणि तिला रस्त्यावर फेकून दिलं.

ही संतापजनक घटना राजस्थानच्या बांसवाडा येथील घाटोल पोलीस स्टेशन परिसरात घडलीय. हा दहा दिवसांपूर्वी ही घटना घडली आहे. आरोपींनी अल्पवयीन मुलीचे अपहरण केलं तिला आपल्या आत्याच्या घरी नेलं तेथे तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. नराधमांनी पीडितेला रस्त्यावर फेकून दिलं होतं. तेव्हा त्या रस्त्यावरून जाणाऱ्यांनी बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या मुलीला रुग्णालयात दाखल केलं.

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी मुलीच्या कुटुंबातील सदस्यांना बोलावले. बांसवाडा येथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले परंतु त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पीडितेला उपचारासाठी उदयपूर येथील एमबी रुग्णालयात पाठवण्यात आलंय. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींपैकी एक हा अल्पवयीन मुलाच्या शाळेचा माजी विद्यार्थी आहे. कुटुंबाने आरोपीविरुद्ध पोलीस तक्रार दाखल करण्यात आलीय.

crime news
Shocking: भयंकर! बहीण तरूणाच्या प्रेमात पडली, भावाच्या डोक्यात हैवान घुसला, चाकूच्या धाकावर दोनदा बलात्कार

पीडितेच्या कुटुंबाने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांची मुलगी २० ऑगस्ट रोजी सकाळी शाळेत गेली होती. ती शाळेतून घरी परतण्यासाठी ऑटोची वाट पाहत होती. तेवढ्यात दोन तरुण दुचाकीवरून आले. त्यांनी तिला बाईकवरून घरी सोडून देऊ असं सांगितलं. या दोघांपैकी एक तरुण तिच्या शाळेचा माजी विद्यार्थी होता. त्या दोघांनी तिला जबरदस्तीनं बाईकवर बसून तिला त्यांच्या आत्याच्या घरी नेलं. त्या दोघे रात्रभर दारू प्यायले नंतर मुलीला मारहाण करत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये बाटली घातली.

crime news
Crime : पाठलाग केला, पेट्रोल ओतलं अन् पेटवून दिलं; संशयानं डोकं फिरलं, लिव्ह-इन पार्टनरला जिवंत जाळलं

अल्पवयीन मुलीवर उदयपूरच्या एमबी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पीडितेच्या आईने उदयपूरचे पोलीस महानिरीक्षक गौरव श्रीवास्तव यांच्याकडे तक्रार दाखल करत मुलीसोबत घडलेली घटना सांगितली. दोन्ही आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी श्रीवास्तव यांच्याकडे केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com