Ahmedabad Crime News Saam Tv
क्राईम

Ahmedabad Crime News: विम्याच्या पैशांसाठी स्वतः च्याच मृत्यूचा खोटा बनाव; आरोपीला १७ वर्षांनंतर अटक

Crime News: विम्याचे पैसे मिळवण्यासाठी चक्क स्वतः च्या मृत्यूचा बनाव रचल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Uttar Pradesh Crime News:

विम्याचे पैसे मिळवण्यासाठी चक्क स्वतः च्या मृत्यूचा बनाव रचल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. अनिलसिंग चौधरी (वय ३९) असे आरोपीचे नाव असून त्याला तब्बल १७ वर्षांनी त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

अनिलसिंगला मंगळवारी रात्री अहमदाबाद येथून अटक करण्यात आली. आरोपी गेल्या 17 वर्षांपासून नवीन ओळख घेऊन अहमदाबादमध्ये राहत होता. त्याने विम्याच्या 80 लाख रुपयांसाठी स्वतः च्या मृत्यूचा बनाव रचला होता. त्यासाठी त्याने कुटुंबियांच्या साहाय्याने एका भिकाऱ्याला ठार मारले. अहमदाबाद क्राइम ब्रँचने बुधवारी अनिलसिंग चौधरीला (वय ३९) मॅजेस्ट्रेट कोर्टात हजर केले. आरोपीला २५ नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिलसिंग हा गेल्या १७ वर्षांपासून राजकुमार विजयकुमार चौधरी या नावाचा वापर करुन राहत होता. आग्रा येथील रकाब गंज पोलिस स्टेशन पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्याचा 31 जुलै 2006 रोजी मृत्यू झाला होता. परंतु अनिलसिंग आणि त्याच्या वडिलांनी या बनावट अपघाताची योजना आखली होती. ज्यात एका भिकाऱ्याचा मृत्यू झाला, असे उघडकीस झाले.

अहमदाबाद क्राइम ब्रँचच्या माहितीनुसार, अपघाच्या दोन वर्षापूर्वी अनिलसिंग आणि त्याच्या वडिलांनी अपघाती विमा पॉलिसी खरेदी केली होती. त्याचसोबर कार खरेदी केली होती. अपघाताच्या सहा महिन्यांपूर्वीच विमा उतरवला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या दिवशी अनिलसिंगने एका भिकाऱ्याला दोरीने बांधून ठेवले होते. त्याला खाऊ घातले आणि नंतर गाडीत बसवले. त्यानंतर त्याने आणि त्याच्या वडिलांनी कारला धडक दिली. ज्यात त्या भिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी अपघातानंतर अनिलसिंगच्या वडिलांशी संपर्क साधला. त्यांनी मृतदेह अनिलसिंगचा असल्याचे ओळखले आणि त्याच्यावर अंतिम संस्कार केले. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी 80 लाखाच्या विमा पॉलिसीवर दावा केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिलसिंग हा निकोल येथील दिव्या रेसिडेन्सीमध्ये राहत होता. ही माहिती पोलिस निरीक्षक मितेश त्रिवेदी यांना मिळाल्यानंतर त्याच्या घरी छापा टाकत आरोपीला अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान अनिलसिंगने खरी ओळख सांगितली.

उत्तर प्रदेशमधील गौतम बुद्ध नगरमधील रहिवासी असलेला अनिलसिंग 2006 मध्ये गुजरातमध्ये आला. त्यानंतर त्याने राजकुमार विजयकुमार चौधरी या नावाने त्याने ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड आणि पॅन कार्ड काढले होते. अनिलसिंगने 2006 नंतर कधीही आपल्या कुटुंबियांशी फोनवर संपर्क साधला नाही. तो त्यांना फक्त दिल्ली आणि सुरतमध्येच भेटायचा.

आरोपी ड्रायव्हिंग लायसन्स मिळाल्यानंतर अहमदाबादमध्ये रिक्षा चालवत असे. त्याने लोनवर रिक्षा घेतली, लग्न केले. त्यानंतर विम्याचे पैसे मिळाल्यानंतर कार खरेदी केली. त्याचे वडिल, भाऊ आणि दोन मित्रांनी विम्याच्या रक्कमेसाठी दावा केला होता, असे इन्स्पेक्टर मितेश त्रिवेदी यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

SCROLL FOR NEXT