Ahilyanagar Crime Saam Tv
क्राईम

Crime: अहिल्यानगर हादरले! घरात घुसून महिलेवर सामूहिक बलात्कार अन् अमानुष मारहाण, नातेवाईकांनीच केलं भयंकर कृत्य

Ahilyanagar Crime: अहिल्यानगरमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. घरात घुसून महिलेला बेदम मारहाण करत बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Priya More

सुशिल थोरात, अहिल्यानगर

अहिल्यानगरमध्ये महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अहिल्यानगरच्या केडगावमध्ये ही घटना घडली. या ठिकाणी चौघांनी महिलेवर सामूहिक अत्याचार करून अमानुष मारहाण करण्यात आली. जुन्या वादातून ही घटना घडली. महिलेवर एकने लैंगिक अत्याचार केला तर इतर तिघांनी या महिलेला बेदम मारहाण केली. या घटनेमुळे अहिल्यानगरमध्ये खळबळ उडाली. यया प्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगरच्या केडगाव भागातील दूध सागर सोसायटीमध्ये ही घटना घडली. जुन्या भांडणाच्या कारणावरून एका व्यक्तीने या महिलेवर लैंगिक अत्याचार केले तर तिघांनी या महिलेला बेदम मारहाण केली. मारहाणीत महिला गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डाळखुष काळे, अक्षय काळे, विनेश काळे आणि मोनेश चव्हाण अशी आरोपींची नावं आहेत. या चारही आरोपींविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी डाळखुश काळे या आरोपीला ताब्यात घेतलं. तर इतर तिघे आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित महिला हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. मागील भांडणाच्या कारणातून मनात राग धरून आरोपींनी हे कृत्य केले आहे. या घटनेत महिलेला मारहाण करण्यात आली असून तिच्यावर सध्या शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पीडित महिला विवाहित असून तिला मुलं देखील आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी डाळखुश काळे हा आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे तर इतर तिघे आरोपी सध्या फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी जिल्ह्याबाहेर पोलिस पथके रवाना करण्यात आली असल्याची माहिती शहर पोलिस उपाधीक्षक अमोल भारती यांनी दिली आहे. या घटनेमुळे अहिल्यानगरमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

पोलिस उपाधीक्षक अमोल भारती यांनी सांगितले की,'डाळखुश काळेच्या कुटुंबातील मुलीचे पीडित महिलेच्या दिरासोबत लग्न झाले होते. तिला व्यवस्थित नांदवत नसल्यामुळे याच कारणावरून या दोन्ही कुटुंबांमध्ये पूर्वीपासून वाद सुरू आहेत. हे सर्व एकमेकांचे नातेवाईक आहे. याचाच राग मनात धरून आरोपींनी महिलेवर अत्याचार करून तिला अमानुष मारहाण केली.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Black Tea Benefits: महिनाभर रोज एक कप कोरा चहा प्यायल्याने शरीरावर काय परिणाम होतो?

Black spots on onion: कांद्यावरील काळे डाग ठरू शकतात धोक्याची घंटा; खाण्यापूर्वी या गोष्टी तपासा

Maharashtra News Live Update: बी.कॉम.च्या कथित बनावट पदवी प्रकरणाविरोधात NSUI च्या आंदोलन

Banking News : बँकांनी ग्राहकांच्या खिशातून उकळले ₹२६,१७० कोटी, तुमच्याही खात्यातून बँक पैसे कट करत नाहीये ना?

सर्वात मोठी बातमी! परीक्षा सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर, आता राज्यसभेत 'परीक्षा'

SCROLL FOR NEXT