Malkapur Crime : बुलढाणा हादरले! घरात घुसून पती, सासूला मारहाण; गरोदर महिलेला जंगलात ओढून नेत दोघांकडून अत्याचार

Buldhana News : लोखंडी विळा, विटांचा वापर करून पीडितेच्या सासूला आणि पतीला बेदम मारहाण करून जखमी केले. त्यानंतर शस्त्राचा धाक दाखवून पीडित गर्भवती महिलेचे किडनॅपिंग करत घरातून ओढत नेले
Malkapur Crime
Malkapur CrimeSaam tv
Published On

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात हादरवणारी घटना समोर आली आहे. रात्रीच्या सुमारास घरात घुसून परिवाराला बेदम मारहाण केली. यानंतर गरोदर महिलेला ओढून जंगलात नेत दोघांनी जबरदस्ती अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून सदर महिलेच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्यात दररोज महिलांवरील अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. यात आता बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातून एक अत्यंत संतापंजनक घटना समोर आली आहे. यात एका २१ वर्षीय गर्भवती विवाहितेचे घरात घुसून अपहरण केले. यानंतर तिला जंगलात घेऊन जात तिच्यावर दोघा नराधमांनी अत्याचार केल्याची घटना समोर आली. सदर घटना १० जुलैच्या रात्री घडली आहे.   

Malkapur Crime
Nitin Deshmukh : लक्षवेधी मांडू न देण्यासाठी विधानसभा अध्यक्ष मॅनेज; राहूल नार्वेकरांवर आमदार नितीन देशमुख यांचा गंभीर आरोप

पती व सासूला केली बेदम मारहाण 

दरम्यान पीडित महिला पती, सासू आणि मुलासह शेतात राहते. १० जुलैला रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास मोहन बारेला आणि त्याचा एक साथीदार असे दोघे पीडित विवाहितेच्या घरात घुसले. त्यांनी लोखंडी विळा, विटांचा वापर करून पीडितेच्या सासूला आणि पतीला बेदम मारहाण करून जखमी केले. त्यानंतर शस्त्राचा धाक दाखवून पीडित गर्भवती महिलेचे किडनॅपिंग करत घरातून ओढत नेले. 

Malkapur Crime
Jalna : मद्यधुंद मुख्याध्यापक वर्ग खोलीतच काढतोय झोप; टाकळी जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकार

जंगलात नेत केला अत्याचार 

सदर पीडित महिलेला बहापुरा शिवारात नेऊन तिथे दोघा नराधमांनी विवाहितेवर जबरदस्ती बलात्कार केला. या प्रकारानंतर पीडित विवाहितेने रात्रीच्या अंधारात रस्ता शोधत कसेबसे घर गाठले. यानंतर कुटुंबियांना घेऊन या घटनेची तक्रार पोलिसात देण्यात आली आहे. पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com